दरोडा टाकण्याचा कट उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:15 IST2021-08-26T04:15:28+5:302021-08-26T04:15:28+5:30

अमरावती : दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तीन आरोपींना शहर कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. २४ ऑगस्ट रोजी टोपेनगर परिसरातील गणेश ...

The plot was foiled | दरोडा टाकण्याचा कट उधळला

दरोडा टाकण्याचा कट उधळला

अमरावती : दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तीन आरोपींना शहर कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. २४ ऑगस्ट रोजी टोपेनगर परिसरातील गणेश मंडळ कार्यालयाच्या मागील परिसरात ही कारवाई करण्यात आली.

अमन रौराळे (२४, समाधाननगर), रोशन गवई (२८, समाधाननगर) व हर्षत मेश्राम (२२, इर्विननीजकच्या पाणपोईजवळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शेख जावेद उर्फ दादू शेख साबीर (३०, लालखडी) व निरंजन कळसकर (३६, भटवाडी) हे दोन आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. २४ ऑगस्ट रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गजानन रेवस्कर हे पेट्रोलिंग करत असताना काही जण टोपेनगर परिसरातील गणेश मंडळ कार्यालयाच्या मागील परिसरात तोंंडाला रूमाल बांधून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून रेवसकर हे पथकासह तेथे पोहोचले असता, दोघे पळून गेले, तर तिघांकडून लोखंडी टॉमी, मिरची पावडर पॅकेट, दोरी, १४ इंच लांबीचा चाकू असा ऐवज आढळून आला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी पाचही आरोपींविरूद्ध कलम ३९९ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: The plot was foiled