पांढरी सालेपूर रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST2021-07-22T04:09:44+5:302021-07-22T04:09:44+5:30
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत पांढरी सालेपूर या चार किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. यात ...

पांढरी सालेपूर रस्त्याची दुर्दशा
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत पांढरी सालेपूर या चार किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. यात रस्ता कमी अन् खड्डेच अधिक पहायला मिळत आहेत. रस्त्यावरील डांबर, गिट्टीसह उखडले गेले आहे.
पांढरी आदिवासी बहुल गाव असून त्यांची बाजारपेठ परतवाडा आहे. आरोग्य सेवेकरिताही त्यांना परतवाडाकडेच यावे लागते. त्यांना ये-जा करण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. त्याचीच पार वाट लागल्यामुळे लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. लोकांचे जीव धोक्यात आले आहेत.
जेमतेम तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे बांधकाम झाले आहे. डांबरीकरणासह हा रस्ता अस्तित्वात आणला गेला. हा गावाला जोडणारा मुख्य रस्ता. मुख्यतः गावा करीताच बनविला गेला.
दरम्यान, या रस्त्यावर बारा चाकी, दहा चाकी ट्रकची वर्दळ वाढली. अवैध उत्खननातून मोठ्या प्रमाणात गौण खनिज त्या परिसरातून पळविले गेले. रोज ५० ट्रकांची ये-जा असते. त्यामुळे हा रस्ता उत्खननकर्त्यांनी व गौण खनिज पळविणाऱ्यांनी नेस्तनाबूत केला. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना होत आहे. या रस्त्याचे नव्याने मजबुतीकरणासह डांबरीकरण करण्याची मागणी पांढरीवासीयांनी केली आहे. दरम्यान, रस्ता पुन्हा गावकऱ्यांकरिता की अवैध गौण खनिज पळविणाऱ्यांकरिता असा प्रश्न आता गावकरीच उपस्थित करू लागले आहेत.
दि21/7/21 फोटो