वायगाव फाट्यावरील रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST2020-12-06T04:12:20+5:302020-12-06T04:12:20+5:30

पान ३ चौकातील रस्त्याचे बांधकाम रखडले टाकरखेडा शंभू : अमरावती ते परतवाडा महामार्गावरील वायगाव फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था झाली ...

The plight of the road on the Wayagaon fork | वायगाव फाट्यावरील रस्त्याची दुर्दशा

वायगाव फाट्यावरील रस्त्याची दुर्दशा

पान ३

चौकातील रस्त्याचे बांधकाम रखडले

टाकरखेडा शंभू : अमरावती ते परतवाडा महामार्गावरील वायगाव फाट्यावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. फाट्यावरील दोन्ही बाजूंचे रस्ते चकाकत असताना, चौकातील रस्त्याचे बांधकाम गत सहा महिन्यांपासून रखडले आहे. दिवसेंदिवस या चौकातील खड्डे मोठे होत असल्याने या महामार्गावरील वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनादेखील वाढल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वायगाव फाट्यावरील चौकात यापूर्वी मोठे अपघात झाले आहेत. त्यात सध्यादेखील या मार्गावरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या काठावरून दोन्ही बाजूंनी आपली वाहने काढताना कसरत करावी लागते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, लवकरच या चौकातील रस्त्याचे बांधकाम करू, अशी माहिती त्यांनी दिली.

*-------------------

Web Title: The plight of the road on the Wayagaon fork