कलेक्ट्रेट ते भूमिअभिलेख कार्यालय रस्त्याची दुर्दशा
By Admin | Updated: December 17, 2015 00:24 IST2015-12-17T00:24:22+5:302015-12-17T00:24:22+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय ते भूमिअभिलेख कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे.

कलेक्ट्रेट ते भूमिअभिलेख कार्यालय रस्त्याची दुर्दशा
अपघात वाढले : वाहनधारक करतात तारेवरची कसरत, सर्व प्रमुख कार्यालये याच मार्गावर
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय ते भूमिअभिलेख कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. येथून वाहतूक करताना ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी शंका येते.
या मुख्य व वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडतात. यामध्ये कित्येक वाहनधारक जखमी होतात. मात्र, तरीही या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय, कुटुंबिक न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये व न्यायालय असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे महानगरपालिकेने या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
या परिसरात चहा टपरीवाल्यांनी केले अतिक्रमण
ट्रेझरी कार्यालयासमोर या परिसरात चहा टपरीवाल्यांनी व पानठेलेवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भर रस्त्यावर ग्राहकांसाठी रस्त्याच्याकडे पर्यंत खुर्ची टाकण्यात येतात. त्यामुळे येथील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. येथे हातगाडीवाले राजरोसपणे आपल्या फिरत्या गाड्या लावतात व अतिक्रमण करतात.