सक्रिय सहा रुग्ण असल्याचा सुखद नीचांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:28+5:302021-09-21T04:14:28+5:30
अमरावती : कोरोना संसर्ग काळातील दीड वर्षात पहिल्यांदा सर्वात कमी सहा सक्रिय रुग्णांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. या सुखद ...

सक्रिय सहा रुग्ण असल्याचा सुखद नीचांक
अमरावती : कोरोना संसर्ग काळातील दीड वर्षात पहिल्यांदा सर्वात कमी सहा सक्रिय रुग्णांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. या सुखद नीचांकामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सोमवारी १७७ नमुन्यांची तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह निरंक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६,१०० कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. एप्रिल महिन्यातील दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहोचली होती. पहिल्या लाटेत १,४०० ऑक्टिव्ह रुग्ण होते. आता दोन महिन्यात संसर्ग माघारला आहे व जिल्ह्यात सध्या सहा सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चार जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यामधील चार रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील, तर दोघे ग्रामीणमधील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
पाच जण संक्रमणमुक्त
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, सोमवारी पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ९४,४९८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. ही टक्केवारी उच्चांकी ९८.३३ टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात बहुतांश दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या निरंक राहिलेली आहे.