वन्यप्राणी सरंक्षणासाठी आता प्लास्टिक तोरणांचा आधार

By Admin | Updated: January 5, 2015 22:54 IST2015-01-05T22:54:37+5:302015-01-05T22:54:37+5:30

राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळा तसेच शासकीय कार्यालयात लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक तोरणाचा उपयोग आता वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी नवा पर्याय शेतकऱ्यासमोर उभा झाला आहे़ जिल्ह्यातील २० हजार

Plastic porosity base now for wildlife protection | वन्यप्राणी सरंक्षणासाठी आता प्लास्टिक तोरणांचा आधार

वन्यप्राणी सरंक्षणासाठी आता प्लास्टिक तोरणांचा आधार

२० हजार हेक्टरमध्ये वापर : सोलर कम्पाऊंडला पर्याय
मोहन राऊत - अमरावती
राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळा तसेच शासकीय कार्यालयात लावण्यात येणाऱ्या प्लास्टिक तोरणाचा उपयोग आता वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी नवा पर्याय शेतकऱ्यासमोर उभा झाला आहे़ जिल्ह्यातील २० हजार हेक्टर मध्ये या तोरणापासून पिकाचे सरंक्षण झाल्याची माहिती पुढे आली आहे़
राज्यात पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरू आहे़ नापिकी, सावकारांचे व बँकेचे कर्ज सोबतच शेतात उभे पीक फस्त करणाऱ्या वन्यप्राण्यांच्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी होऊन आत्महत्या केल्याचे कारण पुढे येत आहे़ उभे पीक वन्यप्राण्यांनी जमीनदोस्त केल्याच्या घटना दररोज घडत आहे़ पिकाच्या सरंक्षणाकरिता शेतकऱ्यांनी आता नवा पर्याय शोधला आहे़
२८ रूपयात होतेय शेतीचे सरंक्षण
गणराज्यदिन, स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्रदिन या दिवशी शाळेत तथा शासकीय कार्यालयात लावणारे प्लॉस्टीक चे तोरण शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरले आहे़ २८ रूपयांच्या किंमतीचे प्लॉस्टीक तोरण जमीनीपासून सव्वा ते दिड फुट अंतरावर हे तोरण बांधण्यात येते़ विशेषत: वन्य प्राण्यांच्या डोळ्याची दृष्टी या तोरणावर पडल्यामुळे रानडुक्कर तसेच वन्यप्राणी शेतीजवळ येत नाही़ रात्रीला या तोरणात असलेले रंगीबेरंगी पताका चमकतात व हवेमुळे आवाज येत असल्याने वन्यप्राणी दुर पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे़

Web Title: Plastic porosity base now for wildlife protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.