शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

प्लास्टिकचा खच, प्रक्रिया शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:35 IST

संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच आढळून येत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. प्लास्टिकबंदी आणि प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयाची अवमानना चालविल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था : जप्त प्लास्टिकचा साठा धूळखात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी प्लास्टिकचा खच आढळून येत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने महापालिकेला मर्यादा आल्या आहेत. प्लास्टिकबंदी आणि प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात महापालिकेने उच्च न्यायालयाची अवमानना चालविल्याचा आरोप होत आहे.२३ जूनपासून राज्यात सर्वत्र प्लास्टिकबंदी करण्यात आली. तत्पूर्वी सर्व नियोजन प्राधिकरणने व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्लास्टिक प्रक्रिया केंद्रे उभारावित, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. तसे शपथपत्र राज्य सरकारने न्यायालयात दाखल केले. त्यानंतर संपूर्ण प्लास्टिकबंदी अमलात आणली गेली. प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा, विक्री, वितरणावर बंदी आणली. अमरावती महापालिकेनेही आतापर्यंत ६०० किलोच्यावर प्लास्टिकसाठा जप्त केला. याशिवाय कारवाई नको म्हणून व्यापारी, नागरिक व अन्य घटकांनी प्लास्टिक कचऱ्यात फेकून दिले. परिणामी दररोज निघणाºया २०० ते २५० टन कचºयामध्ये ६० ते ७० टक्के प्लास्टिकचा कचरा निघू लागला. प्लास्टिक प्रक्रिया केंद्र सुरू नसल्याने शहरातील संकलित केलेला प्लास्टिक कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत विना प्रक्रिया साठविला जातो. पर्यावरण विभागाने याकडे दुर्लक्ष चालविले असून, प्लास्टिकबंदीशी आपले काय देणे-घेणे, या मानसिकतेतून प्लास्टिकबंदीचा विषय आरोग्य व स्वच्छता विभागाकडे ढकलण्यात आला आहे. सुकळी कंपोस्ट डेपोतील प्लास्टिक प्रक्रिया केंद्र विविध कारणांनी पावणेदोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे प्लास्टिक कचºयाचा प्रश्न पेटण्याचे संकेत आहेत.पर्यावरण अधिकारी कारवाईपासून दूरसुकळीचा प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटचा लाभ शून्य आहे. मात्र, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतरही तो प्रकल्प अधिक वेगाने कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त पर्यावरण अधिकाºयांना याबाबत जाब विचारतील काय? की हेमंत पवारांप्रमाणे निपाणेही त्यांना पाठीशी घालणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी