उत्तर झोनमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती मोहीम
By Admin | Updated: June 30, 2016 00:22 IST2016-06-30T00:22:21+5:302016-06-30T00:22:21+5:30
महानगरपालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या निर्देशावरून सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवारी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

उत्तर झोनमध्ये प्लास्टिक कॅरीबॅग जप्ती मोहीम
प्रदूषण : महापालिका प्रशासनाचा पुढाकार
अमरावती : महानगरपालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्या निर्देशावरून सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवारी प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये राठीनगर, शेगाव नाका, कठोरा रोड, गाडगेनगर, पंचवटी या ठिकाणी, बिकानेर स्विट मार्ट, राठीनगर १० हजार रुपये दंड, बालाजी हार्डवेअर शेगाव नाका, ५ हजार रुपये दंड, मनभरी शॉप शेगाव नाका, ५ हजार रुपये दंड, आनंद मेडिकल शेगाव नाका, ५०० रुपये दंड, रमेश किराणा शेगाव नाका, ५ हजार रुपये दंड, वैशाली राजपुरोहित कठोरा नाका, ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक (कॅरीबॅग) बाबत दुकान व हातगाड्यांवर तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान दुकानधारकाच्या नावे नोटीस बजावण्यात आली तसेच ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक धनंजय शिंदे, स्वास्थ्य निरीक्षक अनिल गोहर, एम. आर. डवरे, अरुण पाटील, एस. डी. हानेगावकर, एन. बी. पाठक, डी. एम. निंधाने, एस. एस. राजुरकर, ए. एस. तिडके यांनी भाग घेतला.
झोनमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक कॅरीबॅग त्वरित जप्त कराव्या व संबंधित प्रतिष्ठानांवर दंडात्मक कार्यवाही करुन प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करावी. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक निर्मूलन मोहीम राबवावी, असे निर्देश मनपा आयुक्तांनी पाचही सहायक आयुक्तांना दिले होते. (प्रतिनिधी)