प्रत्येक भागात वृक्ष लागवड
By Admin | Updated: July 3, 2016 00:11 IST2016-07-03T00:11:19+5:302016-07-03T00:11:19+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१६ दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका परिसरात....

प्रत्येक भागात वृक्ष लागवड
महापालिका : महापौरांकडून शिवटेकडीवर वृक्षारोपण
अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव २०१६ दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका परिसरात मैदान, उद्याने, मोकळ्या जागेत, शाळामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ६ वाजतापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते शिवटेकडी येथे सकाळी ६ वाजता करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, सहायक आयुक्त मदन तांंबेकर, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर उपस्थित होते.
आमदार सुनील देशमुख यांच्या हस्ते सकाळी १० वाजता शाळा क्र. १९ रुक्मिणीनगर येथे मनपातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त हेमंत पवार, नगरसेवक नितीन देशमुख, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपआयुक्त विनायक औघड, शहर अभियंता जीवन सदार, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, शिक्षणाधिकारी विजय गुल्हाने, वैद्यकीय अधिकारी सीमा नेताम कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, माजी स्थायी समिती सभापती पप्पू पाटील, माजी नगरसेवक विजय वानखडे, दिलीप वैद्य, विजय राऊत अशोक रेवसकर, दिलीप लोटिया, वैभव देशमुख, प्रतिभा वानखडे, उज्वला मेश्राम, कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुतरमारे उपस्थित होते.