ढिगाऱ्यांवर महापालिका आयुक्त, उपायुक्तांच्या समाधीचे फलक
By Admin | Updated: September 27, 2014 23:07 IST2014-09-27T23:07:55+5:302014-09-27T23:07:55+5:30
नवाथे नगरवासीयांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. त्यानुषंगाने कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम सुरु करुन डांबर व गिट्टीच्या मिश्रणाचा ढिगारा

ढिगाऱ्यांवर महापालिका आयुक्त, उपायुक्तांच्या समाधीचे फलक
नवाथे नगरात आंदोलन : खड्डे बुजविण्यासाठी दिले होते निवेदन
अमरावती : नवाथे नगरवासीयांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. त्यानुषंगाने कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम सुरु करुन डांबर व गिट्टीच्या मिश्रणाचा ढिगारा रस्त्याच्या मधात आणून टाकला. मात्र मागील पाच दिवसांपासून तो ढिगारा रस्त्याच्या मधोमध पडून असल्यामुळे नागरिकांनी शनिवारी दुपारी त्या ढिगाऱ्यावर महापालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या समाधीचे फलक लावून निदर्शने केली.
दसरा मैदान ते सातुर्णा परिसरातपर्यंतच्या मार्गावर हजारो खड्डे निर्माण झाले आहेत. याच मार्गाने दिवसभरात हजारो भाविक अंबादेवी व एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र मार्गाची दुर्देशा बघता संपूर्ण मार्गावर हजारो खड्डे निर्माण झाले आहे. त्याकरिता पाच दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. निवेदन देताच दुसऱ्याच दिवशी त्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदाराने सुरु केले.
त्याकरिता कंत्राटदाराने डांबर व गिट्टीचे मिश्रण खड्ड्यात टाकण्यास सुरुवात केली. मात्र पसरविले नाही. त्यामुळे पाच दिवसांपासून मार्गावरील एका खड्डयात डांबर व गिट्टीचे मिश्रणाचा ढिगारा बनला आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा ढिगारा खड्डयामध्ये पसरविण्यात न आल्याने शेवटी शनिवारी दुपारी नवाथे नगरातील नरेन्द्र कापसे, राजू जगताप, राजू आखरे, अमित डहाके, शक्ती तिडके, बाळू नेवारे, पंकज जुननकर, मनीष मिश्रा, नीलेश शिंदे, दिनेश गवई, उमेश काळे, बाबी यादव, अक्षय सरोदे, आशय वैजापूरकर आदींनी निदर्शने केली. (प्रतिनिधी)