युवकाच्या कानशिलात लगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:35 IST2021-02-20T04:35:22+5:302021-02-20T04:35:22+5:30

अमरावती : मुंबईला आलेल्या मित्राला, तू येथील युवकासोबत राहू नको, या कारणावरून वाद होऊन आरोपीने एका युवकाच्या कानशिलात लगावल्याची ...

Placed in the ear of a youth | युवकाच्या कानशिलात लगावली

युवकाच्या कानशिलात लगावली

अमरावती : मुंबईला आलेल्या मित्राला, तू येथील युवकासोबत राहू नको, या कारणावरून वाद होऊन आरोपीने एका युवकाच्या कानशिलात लगावल्याची घटना बेनोडा येथील भीमटेकडीनजीक गुरुवारी घडली.

याप्रकरणी पोलिसांनी आशिष शेंडे, वैभव सरोदे (दोन्ही रा. बेनोडा ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. प्रीतम सुधाकर बागडे (२८, रा. रिद्धपूर) यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------

ट्रकला ब्रेक, दुचाकीवरून घसरली महिला

अमरावती : भरधाव ट्रकने वळण रस्त्यावर अचानक ब्रेक मारल्याने मागून येणारी दुचाकीही अचानक थांबली. यावेळी दुचाकीस्वार युवकाची आई रस्त्यावर कोसळून जखमी झाली. ही घटना बोर्डी ते मार्डी मार्गावर बुधवारी घडला. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी आदित्य ढोले (२८, रा. आर्वी नाका, वर्धा) यांच्या तक्रारीवरून ट्रक (केआर १६ डी ३५४०) चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------

प्रवीणनगरातील दुचाकी चोरी

अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील प्रवीणनगर येथून २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच २७ बीजे ७८२३) अज्ञात आरोपीने ६ फेब्रुवारी रोजी चोरून नेली. पोलिसांनी फिर्यादी शेख फहीम शेख रहीम (३२, रा. प्रवीणनगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------------------

Web Title: Placed in the ear of a youth