शासकीय कोंडवाड्याची जागा खासगी व्यक्तीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:19+5:302021-04-10T04:12:19+5:30
हनवतखेडा ग्रामपंचायतचा प्रताप परतवाडा : अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा ग्रामपंचायतीच्या शिकस्त कोंडवाड्याची जागा खासगी व्यक्तीला दिल्याची तक्रार करण्यात आली असून, ...

शासकीय कोंडवाड्याची जागा खासगी व्यक्तीला
हनवतखेडा ग्रामपंचायतचा प्रताप
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा ग्रामपंचायतीच्या शिकस्त कोंडवाड्याची जागा खासगी व्यक्तीला दिल्याची तक्रार करण्यात आली असून, यासंदर्भात चौकशी आरंभ करण्यात आली आहे.
हनवतखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व सचिव यांनी पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत मालकीची शासकीय मालमत्ता असलेला कोंडवाडा खासगी वापराकरिता हस्तांतरित केला आहे. सदर जागेवरील कोंडवाड्याची इमारत ग्रामपंचायत स्थापनेपासून होती. ती शिकस्त झाल्याने पाडून सदर जागेवर खासगी इमारत बांधकाम सुरू असल्याची तक्रार अचलपूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेला करण्यात आली होती. त्यावरून अचलपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महादेव कासदेकर यांनी चौकशी सुरू केली आहे.
बॉक्स
कोंडवास्याची जागा दुसरीकडे
ग्रामपंचायत नजीकच्या शिकस्त कोंडवाडा असलेली जागा खासगी व्यक्तीची होती. परंतु, ग्रामपंचायत निर्मिती दरम्यान व वडीलधाऱ्यांनी ती कोंडवाड्यासाठी ग्रामपंचायतीला बक्षीस म्हणून दिली. परंतु, मागील गतवर्षी तत्कालीन सरपंच व सचिव यांनी संबंधितांकडून कोंडवाड्यासाठी दुसरी जागा घेतली. हा सर्व प्रकार नियमबाह्य असून, एकदा बक्षीसपत्रावर दिलेली जागा परत घेता येत नसल्याचा नियम आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे संबंधित अधिकारी तथा विस्तार अधिकारी महादेव कास्देकर यांनी लोकमतला सांगितले.