ंदेवरी मार्गावरील खड्डा अपघातप्रवण
By Admin | Updated: June 30, 2017 00:23 IST2017-06-30T00:23:53+5:302017-06-30T00:23:53+5:30
नजीकच्या देवरी निपाणी या रस्त्यालगतच दोन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो.

ंदेवरी मार्गावरील खड्डा अपघातप्रवण
दुर्लक्ष : वाहतुकीला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : नजीकच्या देवरी निपाणी या रस्त्यालगतच दोन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो. हे ठिकाण अपघातप्रवण झाल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची वर्दळ असते.
देवरी येथील माध्यमिक शाळांचे शेकडो विद्यार्थी आष्टी येथे शिकण्यासाठी येतात. शिवाय देवरी ते आष्टी या मार्गावर सर्वाधिक वर्दळ असते. परंतु या रस्त्यालगतच दोन ते तीन फुटांचा मोठा खड्डा पडल्याने आजवर अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. पावसाळ्यात तर हे दोन्ही खड्डे दिसत नसल्यामुळे एखादे वाहन खड्ड्यात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शाळकरी विद्यार्थी सायकलने या मार्गावरून ये-जा करीत असल्याने पावसाळ्यात एखाद्या विद्यार्थ्यांची सायकल या खड्ड्यात जाऊ शकते, त्यामुळे हे अपघातप्रवण खड्डे त्वरित न बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.