मुंबईतून येतात पायरेटेड सीडी
By Admin | Updated: January 10, 2017 00:26 IST2017-01-10T00:26:13+5:302017-01-10T00:26:13+5:30
कॉपी राईट अॅक्टनुसार सीडी व डीव्हीडी पायरेटेड सीडी विक्री करणे गुन्हा आहे.

मुंबईतून येतात पायरेटेड सीडी
गोरखधंदा : अश्लील सीडी विकणाऱ्यांवर धाडी टाका!
अमरावती : कॉपी राईट अॅक्टनुसार सीडी व डीव्हीडी पायरेटेड सीडी विक्री करणे गुन्हा आहे. परंतु नियम धाब्यावर बसवून शहरात पायरेटेड सीडीजची खुलेआम विक्री करण्यात येत आहे. ऐवढेच नाहीतर रस्त्यावरही कवडीमोल भावत या सीडीजचा व्यापार चालतो. यासंदर्भात सीडी विक्रेत्यांशी ग्राहक म्हणून चर्चा केली असता या सीडीज मुंबईतून येत असून याचे नेटवर्क मुंबईत असल्याची माहिती मिळाली.
एखादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या चित्रपटाची किंवा त्याच्या गाण्याची सीडी अंबानगरीत पायरेसी करून उपलब्ध होते. मूळ सीडीज विक्रीचे आधिकार दिगदर्शक करार केल्यानुसार काही नामांकित कंपनीला देतात. त्याचे प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधीसुद्धा नेमलेले असतात. या प्रतिनिधींची व येथील पायरेटेड सीडीज विक्रेत्यांशी मिलीभगत असल्यामुळे त्यांना या व्यापाराची माहिती असल्यानंतरही पोलिसात तक्रार करण्यात येत नाही. जोपर्यंत पोलिसांना अशा प्रकारची तक्रार प्राप्त होत नाही तोपर्यंत पोलीसही कारवाई करीत नाही. त्यामुळे पायरेटेड सीडीज व डीव्हीडीचा हा व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महिन्याकाठी याचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. २० ते ४० रुपयांमध्ये चार चित्रपट असलेली डीव्हीडी नागरिकांना सहज उपलब्ध होते. त्यामुळे यावर अंकुश कोण लावणार असा प्रश्न जागृत नागरिकांना पडला आहे. बडनेरा, रेल्वे स्टेशन चौक, राजापेठ, गांधी चौक, इतवारा, बडनेरा येथील सीडी विक्रेत्यांकडे पायरेटेड सीडीजची विक्री करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
अश्लील सीडींची विक्री होत असताना पोलीस गप्प का ?
ज्या दुकानात पायरेटेडच्या सीडीजची विक्री करण्यात येते. तेथे अश्लील सीडीजचाही व्यापार करण्यात येत आहे. याच दुकानामध्ये ५० ते १०० रुपयांमध्ये अश्लील सीडीजची विक्री करण्यात येत आहे. येथे कॉम्प्युटर मधुन मोबाईलच्या मेमरी कार्ड मध्ये व पेनड्राईव्हमध्ये अश्लील चित्रपटाची अश्लील चित्रपट तरुणांना उपलब्ध होते. यातून शहराममध्ये नको ते प्रकार घडत असल्याच्या घटना पुढे येत आहे. हा प्रकार पोलिसांना माहिती असल्यानंतरही कारवाई का करीत नाही? ते गप्प का, हा सवाल अमरावतीकर विचारत आहेत.