पाईपलाईन फुटून शाळेचे मैदान खरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:15+5:302021-02-05T05:23:15+5:30
फोटो पी ३१ मोशीर् फोल्डर मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) गावातून गेलेली सोफिया कंपनीची पाईप लाईन श्री विवेकानंद विद्यामंदिरजवळ ...

पाईपलाईन फुटून शाळेचे मैदान खरडले
फोटो पी ३१ मोशीर् फोल्डर
मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) गावातून गेलेली सोफिया कंपनीची पाईप लाईन श्री विवेकानंद विद्यामंदिरजवळ दीड महिन्यात दुसऱ्यांदा फुटली. १८ डिसेंबर रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नसताना पुन्हा मैदान वाहून गेले.
अप्पर वर्धा धरणावरून कंपनीत पाणी नेण्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन मोर्शी-तिवसा मार्गालगत विवेकानंद शाळेजवळ मोठे तडे जाऊन ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान फुटली. दीड महिन्यापूर्वी याच ठिकाणी फुटलेली पाईपलाईन पुन्हा फुटली. याचा अर्थ ही दुरुस्ती थातूरमातूर होती का, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. यावेळी शाळेचे खेळाचे मैदान वाहून गेले होते. यावेळी कंपनीने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. ते अद्याप पाळले नाही. मैदानावर मुरुम टाकून मलमपट्टी केली परंतु ते मैदान खेळण्यायोग्य करण्यात आले नाही. त्यावर मोठे दगडधोंडे पसरले आहे. या दुरुस्तीसाठी अद्यापही आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही.
पाईपलाईन हटविण्याची मागणी
सतत एक ते दीड तास पाण्याचा प्रवाह शाळेच्या इमारतीभोवती होता. मैदानात दोन-तीन फूट पाणी साचून होते. यात शाळेची जुनी इमारत शिकस्त होऊन भविष्यात मोठी हानी संभवते. यापूर्वी शाळेलगत पाच-सहा वषार्पूर्वी पाईपलाईन फुटून मोठी हानी झाली होती. त्यावेळी जनावरेही मृत्यूमुखी पडले होते. दीड महिन्यापूर्वी शाळेच्या नुकसानीसोबतच शेणाचे ढिगारेही वाहून गेले होते. सततच्या या पाईपलाईन फुटीमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे. ही पाईपलाईन गावाबाहेरून नेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
——————————