शेतीच्या वादातून पाईपने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST2021-05-06T04:14:09+5:302021-05-06T04:14:09+5:30
अमरावती : शेतीच्या वादातून युवकाच्या डोक्यावर पाईपने मारून जखमी केल्याची घटना बडनेरा ठाणे हद्दीतील अऱ्हाड, कुऱ्हाड येथे मंगळवारी घडली. ...

शेतीच्या वादातून पाईपने मारहाण
अमरावती : शेतीच्या वादातून युवकाच्या डोक्यावर पाईपने मारून जखमी केल्याची घटना बडनेरा ठाणे हद्दीतील अऱ्हाड, कुऱ्हाड येथे मंगळवारी घडली. चिंतामन साहेबराव खडसे (४५, रा. अऱ्हाड, कुऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. संतोष खडसे (३५) यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३२४,५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------------------------
शाळेतून २१ हजारांची एलईडी लंपास
अमरावती : वलगाव ठाणे हद्दीतील रेवसा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतून अज्ञात आरोपीने २१ हजार रुपये किमतीचा एलईडी चोरून नेल्याची घटना १४ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी ४ मे रोजी वलगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मुख्याध्यापक विनोद भगत (५२) यांनी तक्रार नोंदविली.
---------------------------------------------------
धारदार शस्र बाळगणारा ताब्यात
अमरावती : अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगून लोकांमध्ये दहशद पसरविणाऱ्या आरोपीला बडनेरा पोलिसांनी नवी वस्तीतील चांदणी चौकातून मंगळवारी ताब्यात घेतले. मोहम्मद जुनेद शेख कासम (२२,रा. मोमीनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला.