पिंंगळादेवी रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 00:29 IST2016-07-15T00:29:58+5:302016-07-15T00:29:58+5:30
महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या पिंगळादेवीच्या गडावर विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भावित भक्त दर्शन घेण्यासाठी येतात.

पिंंगळादेवी रस्त्याची दुर्दशा
अपघाताची शक्यता : रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी
लेहगाव : महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठापैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या पिंगळादेवीच्या गडावर विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भावित भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. गोराळा पिंगळाई ते पिंगळादेवी गड रस्त्याची पार दयनीय अवस्थाा झाली असून या रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे.
नवरात्रमहोत्सव पूर्वी जर शासनाने हा जीवघेणा रस्ता केला नाही तर यावर्षी पार्किंगची व्यवस्था गडावर होवू देणार नाही. असा सनसनीत इशारा विश्वस्त मंडळाने दिला आहे. पिंगळादेवीच्या गाहवर वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. या रस्त्यावरुन येणाऱ्यावर दररोज लहान मोठे अपघात होतात.रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे गडावर वाहन चढवतांना भाविकांना फार मोठी कसरत करावी लागते. येथे नवरात्री महोत्सवात फार मोठी यात्रा असते. भाविक मोठ्या संख्येने म्हणजे पर दिवशी दहा, पंधरा हजार भाविक येथे दर्शनाचा लाभ घेतात. येथे गर्दी असते. यावर्षी शासनाने हा रोड दुरुस्त केला नाही तर पार्किंगची व्यवस्था गडावर होवू देणार नाही तर ती खाली एक किलोमीटर अंतरावर करावी लागेल असा इशारा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोठे यांनी दिला. दर पांच वर्षानी निवडणूका येताते या निवडणूकीच्या प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करतात या ठिकाणी कार्यकर्त्यांना मेजवाणी देवून मेळावे घेतात आणि देवीचा आशीर्वाद घेवून निवडणूूकीत विजयी होतात. परतुं नंतर मात्र देवीकडे फिरुन ही पाहत नाही. या विभागाचे आमदार , खासदार आणि अधिकारी वर्ग देवीचे दर्शन घेवून जातात परंतु यांना हा जीवघेणा रस्ता का दिसत नाही ही खेदाची बाब आहे. या संदर्भात विश्वस्त मंडळाने या रस्ता दुरुस्ती संदर्भात अधिकारी वर्गाकडे निवेदने दिलीत. मात्र रस्त्याचे काम झाले नाही. (वार्ताहर)