जात प्रमाणपत्रांच्या प्रस्तावांचा ढीग

By Admin | Updated: January 6, 2015 22:51 IST2015-01-06T22:51:25+5:302015-01-06T22:51:25+5:30

विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवे असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी प्रशासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले. मात्र याच्या कामकाजात सुसूत्रता नसल्याने महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी गरजूंना

Pile of proposals for caste certificates | जात प्रमाणपत्रांच्या प्रस्तावांचा ढीग

जात प्रमाणपत्रांच्या प्रस्तावांचा ढीग

गैरसोय : नागरिकांचे प्रस्ताव संथगतीने निकाली
अमरावती : विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवे असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी प्रशासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले. मात्र याच्या कामकाजात सुसूत्रता नसल्याने महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी गरजूंना हेलपाटे मारावे लागत आहे. जातप्रमाणपत्राचे हजारो प्रस्ताव तहसील व उपविभागात पडून आहेत.
राज्य शासनाने विविध जाती, समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण लागू केले. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना अनेक उमेदवारांना जातप्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्राची गरज भासत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, शपथपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र काढावे लागत आहे.
कागदपत्रासाठी धावाधाव
पूर्वी सेतू सुविधा केंद्रातून ही प्रमाणपत्रे काढण्याची सुविधा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्र बंद करुन शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी महा ईसेवा केंद्राद्वारे ही सुविधा सुरु केली. गरजूंना जवळच्या ठिकाणी सर्व प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावीत, हा त्यामागील व्यापक उद्देश आहे.
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मुस्लिम व मराठा समाजाच्या उमेदवारांना १९६७ पूर्वीचे खसरा पाहणी पत्र, वडिलांचा शाळेचा दाखला आदी कागदपत्रे जोडण्याचे सांगण्यात आले होते. केवळ खसरा पाहणीपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालय, नगर भूमापन विभाग, असे अनेक रेकॉर्ड मिळवितानाही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मार्ग काढणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pile of proposals for caste certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.