पीआय गावडे, कुरुळकर मुख्यालयी "अटॅच"

By Admin | Updated: April 23, 2017 00:24 IST2017-04-23T00:24:24+5:302017-04-23T00:24:24+5:30

कामात हयगय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवून वलगावचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे

Pi Gawde, "Attach" to Kurilkar Headquarter | पीआय गावडे, कुरुळकर मुख्यालयी "अटॅच"

पीआय गावडे, कुरुळकर मुख्यालयी "अटॅच"

अमरावती : कामात हयगय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवून वलगावचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे व खोलापुरी गेटचे अनिल कुरुळकर यांना मुख्यालयी "अटॅच" करण्यात आले.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने शनिवारी ही कारवाई करण्यात आली. दोन्ही ठाणेदारांना अटॅज करून खोलापुरी गेट ठाण्याचा पदभार आता नागपुरी गेटचे एपीआय बाबुराव राऊत याच्यांकडे, तर वलगाव ठाण्याचा प्रभार बडनेराचे एपीआय गजानन मेहेत्रे यांच्याकडे सोपविला आहे. वलगाव ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी सरपंचाची हत्या झाली. या प्रकरणात अद्याप आरोपीचा सुगावा लागला नाही. त्यामुळे तपासकार्यात ठाणेदार गावडेंनी हयगय केल्याचा ठपका ठवला. खोलापुरी गेट ठाण्याचे निरीक्षक कुरुळकर यांचेही कार्य समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे. तपास व कारवाईत कार्यतत्परता ठेवण्यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दोन्ही पोलीस निरीक्षकांना वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र, दोन्ही ठाणेदारांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने दोन्ही ठाणेदारांना मुख्यालयी अटॅच केले आहे. त्या

Web Title: Pi Gawde, "Attach" to Kurilkar Headquarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.