सर्वशिक्षा अभियानाचे फिजीओथेरपी केंद्र बंद

By Admin | Updated: January 7, 2015 22:44 IST2015-01-07T22:44:23+5:302015-01-07T22:44:23+5:30

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत येथील गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेले फिजोओथेरपी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत

Physics of the Sarva Shiksha Abhiyan closed | सर्वशिक्षा अभियानाचे फिजीओथेरपी केंद्र बंद

सर्वशिक्षा अभियानाचे फिजीओथेरपी केंद्र बंद

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत येथील गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेले फिजोओथेरपी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून कोट्यवधी रुपयांचे साहित्य धूळखात आहेत.
सर्वशिक्षा अभियानातंर्गत उपक्रम राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळतो. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्वशिक्षा अभियानातंर्गत काही वर्षांपुर्वी सुरु केलेले फिजीओथेरपी केंद्र अचानक बंद केल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ज्या उद्देशाने फिजीओथेरपी केंद्र सुरु करण्यात आले मात्र कालातंराने ते बंद झाल्याने याचा फटका अपंग विद्यार्थ्यांना बसत आहे. अपंग विद्यार्थ्यांना या केंद्राचा माध्यमातून फिजीओथेरेपी करण्यासाठी तज्ञ डॉक़्टरांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. मात्र हे तज्ञ डॉक्टर कुठे आहेत? याचा शोध शिक्षण विभागाने घेतला नाही. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सर्वशिक्षा अभियानतंर्गत साहित्य खरेदी करण्यात आले. हे साहित्य निकामी होईपर्यंत यंत्रणा सुस्तावली असल्याचा आरोप शहर काँग्रेस कमेटीचे ब्लॉक क्र. २ चे अध्यक्ष अभय ढोबळे यांनी केला आहे. गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेल्या फिजीओथेरेपी केंद्रात अद्ययावत यंत्र सामुग्री होती. या केंद्रात जिल्हाभरातून अपंग मुले यायची. परंतु हे केंद्र बंद झाल्याने गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी फिजीओथेरेपीसाठी कुठे जावे, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपयांची साहित्य ही एका खोलीत धूळखात आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Physics of the Sarva Shiksha Abhiyan closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.