‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; कॉलेज युवतीवर बलात्कार, युवकावर गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: October 8, 2023 14:12 IST2023-10-08T14:12:01+5:302023-10-08T14:12:53+5:30

नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा : उदयानात बोलावून शिविगाळ

Physically forced sexual assault on minor girlfriend in Amravati | ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; कॉलेज युवतीवर बलात्कार, युवकावर गुन्हा दाखल

‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; कॉलेज युवतीवर बलात्कार, युवकावर गुन्हा दाखल

अमरावती - प्रपोझला होकार भरताच अल्पवयीन प्रेयसीवर शारीरिक बळजबरी करून तिचे त्या स्थितीतील फोटो काढण्यात आले. पुढे ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ मार्च २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंतच्या कालावधीदरम्यान ती अत्याचाराची मालिका घडली.

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अल्पवयीन पिडिताच्या तक्रारीवरून देवानंद बोडके (रा. यवतमाळ) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी, शिविगाळ व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. येथील एका कनिष्ट महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला देवानंद बोडके याने प्रपोझ केले. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ते दोघेही सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागले. अशातच ६ मार्च २०२२ रोजी रात्री १२ ते १ च्या सुमारास त्याने तिला भेटायला बोलावले. प्रेमाखातर ती देखील गेली. त्यावेळी त्याने तिच्यावर शारीरिक जबरदस्ती केली. तथा तिचे घाणेरडे फोटो देखील काढले. त्यानंतर तुझ्याशी लग्न करतो, अशी बतावणी करून ६ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली.

दरम्यान पिडिताचे १२ वी पेपर संपल्यानंतर तिला आरोपीने गाडगेनगर येथे त्याच्या मित्राच्या खोलीवर बोलावले. तेथे तुझे अश्लिल फोटो माझ्याकडे आहेत, मी अपलोड करेन, अशी भीती दाखवून जानेवारी २०२३ पर्यंत तिचे सर्वस्व लुटले.

मित्रासोबत व्हॉट्सॲपवर का बोललीस?
मित्रासोबत व्हॉट्सॲपवर का बोललीस? असा जाब विचारत त्याने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी तिला एका उद्यानात भेटायला बोलावले. सकाळी ११ च्या सुमारास उद्यानात पोहोचल्यानंतर त्याने तिला शिविगाळ केली. तथा तिच्या गालावर थापडा मारल्या. तो सततचा त्रास सहनशक्तीपलिकडे गेल्याने अखेर तिने ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नांदगाव पोलीस ठाणे गाठले. तथा पोलीस दप्तरी तक्रार नोंदविली.

Web Title: Physically forced sexual assault on minor girlfriend in Amravati