जुन्या प्रेम संबंधाचा उजाळा देऊन महिलेचे शारिरीक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:12 IST2021-04-21T04:12:55+5:302021-04-21T04:12:55+5:30

धामणगाव रेल्वे : नऊ वर्षांपूर्वीच्या प्रेमसंबंधाचा उजाळा देऊन चार महिन्यांपूर्वी माहेरी आलेल्या एका २१ वर्षीय विवाहितेचे सलग तीन महिने ...

Physical abuse of a woman by rekindling an old love affair | जुन्या प्रेम संबंधाचा उजाळा देऊन महिलेचे शारिरीक शोषण

जुन्या प्रेम संबंधाचा उजाळा देऊन महिलेचे शारिरीक शोषण

धामणगाव रेल्वे : नऊ वर्षांपूर्वीच्या प्रेमसंबंधाचा उजाळा देऊन चार महिन्यांपूर्वी माहेरी आलेल्या एका २१ वर्षीय विवाहितेचे सलग तीन महिने शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे शहरात घडला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गोयनकानगर येथे विवाहिता चार महिन्यांपूर्वी माहेरी आली होती. यादरम्यान तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका ३२ वर्षीय युवकाने जुन्या प्रेमसंबंधाचा उजाळा देत तिच्याशी सलगी वाढविली व सलग तीन महिने सदर विवाहित युवतीला तू आपल्या पतीला घटस्फोट देऊन टाक, मग आपण लग्न करू, असे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे तपास करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर आरोपीस अटक झाली नव्हती.

Web Title: Physical abuse of a woman by rekindling an old love affair