विद्यापीठात पीएच.डी. पदवी प्रवेश शुल्क झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:31+5:302021-04-12T04:12:31+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आता आचार्य (पीएच.डी) पदवी प्रवेश शुल्क निम्म्यावर आणले आहे. दर तीन वर्षांनी प्रवेश ...

विद्यापीठात पीएच.डी. पदवी प्रवेश शुल्क झाले कमी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आता आचार्य (पीएच.डी) पदवी प्रवेश शुल्क निम्म्यावर आणले आहे. दर तीन वर्षांनी प्रवेश शुल्कात वाढ करावी, अशी विद्यापीठ नियमावली आहे. मात्र, व्यवस्थापन परिषदेने पीएच.डी. प्रवेशासाठी प्रस्तावित शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यवस्थापन परिषदेचेे सदस्य प्रफुल्ल गवई यांनी पीएच.डी. प्रवेश शुल्कात वाढ करू नये, यासाठी हा विषय पोटतिडकीने मांडला. ७ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने झालेल्या मॅनेजमेंटमध्ये आचार्य पदवी संशोधनासाठी अस्तित्वात असलेल्या शुल्काचा पुनर्विचार करण्याबाबतचा ॲटम क्रमांक २४ अन्वये चर्चा झाली. राज्य शासनाने कोरोनाकाळात कोणत्याही परीक्षांचे शुल्क वाढवू नये, असे पत्र जारी केल्याची बाब गवई यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पीएच.डी. प्रवेश शुल्कात वाढ करता येणार नाही, असे मत प्रफुल्ल गवई, प्रदीप खेडकर आदींनी मांडले. आता प्रवेश शुल्क वाढणार नसल्याने सामान्य विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळविणे सुकर होणार आहे.
---------
असे असणार पीएच.डी. प्रवेश शुल्क
कोर्स वर्क शुल्क (ट्युशन फी)- ५ हजार (मंजूर) १० हजार (अगोदर)
विज्ञान व तंत्रज्ञान - १० हजार (मंजूर)- १५ हजार (अगोदर)
अभियांत्रिकी - ३० हजार (मंजूर), ५० हजार (अगोदर)
कॉमर्स -५ हजार (मंजूर), १० हजार (अगोदर)