विद्यापीठात पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा २ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST2021-04-21T04:13:19+5:302021-04-21T04:13:19+5:30

अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असला तरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल-१ ची ऑनलाईन परीक्षा २ ...

Ph.D. Course work exam on 2nd May | विद्यापीठात पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा २ मे रोजी

विद्यापीठात पीएच.डी. कोर्स वर्क परीक्षा २ मे रोजी

अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असला तरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल-१ ची ऑनलाईन परीक्षा २ मे रोजी घेण्याचे नियोजन चालविले आहे. २६ एप्रिल रोजी मौखिक परीक्षा होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

कोरोना संसगार्मुळे शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० परीक्षांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. मात्र, विद्यापीठाने पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल-१ ची ऑनलाईन व मौखिक परीक्षा घेण्याविषयी नियोजन केले आहे. यात २६ एप्रिल रोजी ऑनलाईन मौखिक परीक्षा, तर २ मे रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा अमरावती विभागातून ११५० उमेदवार देतील. पीएच.डी. कोर्स वर्क ही ऑनलाईन परीक्षा मोबाईल, डेस्क टॉप, लॅपटॉपवरून देता येणार आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट केंद्रातून प्राप्त होतील. हॉल तिकीटसोबत लॉगीन आयडी, पासवर्ड देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यापीठातून परीक्षांबाबतची माहिती परीक्षा केंद्र, विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

----------------

कोट

पीएच.डी. कोर्स वर्क मॉड्युल-१ च्या ऑनलाईन परीक्षेची अधिसूचना सोमवारी निर्गमित केली जाणार आहे. २६ एप्रिल रोजी मौखिक, तर २ मे रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

Web Title: Ph.D. Course work exam on 2nd May