तापाने फणफणतोय जिल्हा
By Admin | Updated: September 22, 2014 23:11 IST2014-09-22T23:11:22+5:302014-09-22T23:11:22+5:30
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे.

तापाने फणफणतोय जिल्हा
अमरावती : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढग, उन्ह व पावसाचा खेळ सुरु असल्याने वातारवणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताप आजारांने प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील चार आठवड्यातच तापाचे २५५१ रुग्ण दाखल झाले असूनही यामध्ये डेंग्यू, मलेरिया, निमोनिया व टायफाईड आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. याकडे आता आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
ताप व डायरियाची प्रतिबंध करण्याकरिता डास निर्मूलन व दूषित पाण्याचा वापर टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यात १ हजारांच्यावर तापाचे रुग्ण दाखल झाले होते. दर दिवसाला ५० ते ६० रुग्ण नुसत्या ताप आजारांचे दाखल केले जात होते. हीच स्थिती पुढेही पहायला मिळत आहे. १८ ते १४ सप्टेंबरदरम्यान ही संख्या मोठ्या संख्येत वाढल्याचे दिसून येत आहे. या चार आठवडयामध्ये २५५१ तापाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. आॅगस्ट मध्ये डेंग्युचे १३ रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पुन्हा डेंग्युचे १५ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे १८ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत टायफाईटचे १००९ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे टायफाईडच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मलेरियाचे १४८१, निमोनियाचे १६ व गॅस्ट्रोचे ( डायरिया) ३८० रुग्ण दाखल करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त तापाचे शेकडो रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यावासी ताप आजारांने फणफणत आहे, असे चित्र आहे. अशा वातावरणामध्ये प्रत्येक घरात एक तापाचा रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात तापाचा प्रभाव वाढता आहे.