तळेगाव दशासर येथून पाळीव पशू चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:39 IST2020-12-17T04:39:50+5:302020-12-17T04:39:50+5:30

धामणगावातून दुचाकी लंपास धामणगाव रेल्वे : शहरातील शिवाजी चौकातून घरासमोर लॉक केलेली एमएच २७ एजी ३७४३ क्रमांकाची दुचाकी १४ ...

Pets stolen from Talegaon Dashasar | तळेगाव दशासर येथून पाळीव पशू चोरले

तळेगाव दशासर येथून पाळीव पशू चोरले

धामणगावातून दुचाकी लंपास

धामणगाव रेल्वे : शहरातील शिवाजी चौकातून घरासमोर लॉक केलेली एमएच २७ एजी ३७४३ क्रमांकाची दुचाकी १४ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली. विजय रमेशचंद्र चांडक (४०) यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

निंबोलीनजीक ट्रकची दुचाकीला धडक

मंगरूळ दस्तगीर : निंबोली ते धामणगाव रेल्वे मागार्वर एमएच ४० बीेएल १३७० क्रमांकाच्या ट्रकने एमएच ३२ एएम १६४४ क्रमांकाच्या दुचाकीने १५ डिसेंबर रोजी धडक दिली. दुचाकीवरील दोन जखमींचे नाव कळू शकले नाही. याप्रकरणी विवेक वैरागडे (४७, रा. निंबोली) यांच्या तक्रारीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३७० अन्वये ट्रकचालक रवि अरुण मोहोड (रा. दानापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

दर्यापुरातील माहेरवासिणीचा हुंड्यासाठी छळ

दर्यापूर : तालुक्यातील ३२ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी तसेच दोन लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी पैठण येथील सासरी मारहाण व मानसिक छळ करण्यात आला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अ, ३४ अन्वये हर्षल जगन्नाथ गुडधे, जगन्नाथ व्यंकटराव गुडधे व दोन महिला (रा. पैठण) यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविला.

-------------

सामूहिक शेतीच्या वादातून मारहाण

वरूड : तालुक्यातील कुरळी येथे रोशन सुनील कुकडे (२४) व त्याच्या आईला सामूहिक शेतातील अतिवृष्टीच्या पैशांबद्दल विचारणा केल्यामुळे मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सिद्धार्थ भीमराव कुकडे, झेलसन सिद्धार्थ कुकडे, लकी सिद्धार्थ कुकडे व एका महिलेविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------

मोर्शी बसस्थानकाहून ४० हजार पळविले

मोर्शी : तालुक्यातील वाठोडा येथील रहिवासी राजेंद्र सदाशिवराव फोपाटे (४५) यांनी वसूल केलेल्या ४० हजारांची रक्कम असलेली पिशवी अज्ञाताने बस स्थानकाच्या रसवंती परिसरातून लंपास केली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये मंगळवारी गुन्हा नोंदविला.

--------------

डोंगरयावली येथे तिघांना मारहाण

लेहगाव : डोंगर यावली येथे मुलगा, पुतण्या व सुनेला काठी-चाकूने मारहाण केल्याची तक्रार महिलेने मोर्शी पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी प्रशांत साहेबराव गवई, सतीश साहेबराव गवई व एका महिलेविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

------------

गुटख्याच्या पैशांऐवजी डोक्यावर दगड

अचलपूर : सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रासेगाव मार्गावर गुटख्याचे पैसे मागितले असता, गौतम दादाराव वानखडे (रा. अचलपूर) याने दिगंबर बळीराम डोईफोडे (५०, रा. मेहराबपुरा) यांच्या डोक्यावर दगड मारला. पोलिसांनी भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.

---------

बासपाणी येथील महिलांची फसवणूक

धारणी : तालुक्यातील बासपाणी येथे ४० हजारांच्या कर्जाचे आमिष देऊन महिलांकडून आधार कार्ड, मतदान कार्ड व दोन छायाचित्रे महिलांकडून घेण्यात आली तसेच प्रत्येकी ११०० रुपये घेऊन ३६३०० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस पाटील प्रमिला महेंद्र कासदेकर (४३) यांनी परतवाडा स्थित सुमित्रा फायनान्सचे गोपाल युवराज भावर व जोशी पांडे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४१९, ४२०, ३४ अन्वये मंगळवारी गुन्हा नोंदविला.

-----------

वडुरा शिवारात सहा जणांची केबल वायर लंपास

परतवाडा : वडुरा शिवारातील संजय रमेश गंगासागर, शेख हारून, गोपाल शंकरराव चौधरी, रामेश्वर रामचंद्र कोहर, सचिन सुखदेव बेदरकर व चेतन मोतीराम खंडारे यांची १३ हजार ४६० रुपयांची केबल अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Pets stolen from Talegaon Dashasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.