गावठी दारु विक्रेत्यांची राज्य उत्पादन शुल्क पथकावर दगडफेक
By Admin | Updated: July 12, 2015 00:32 IST2015-07-12T00:32:48+5:302015-07-12T00:32:48+5:30
मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर गावठी दारु तयार करणारे मोठे कारखाने असून वरुड, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यात मोठया प्रमाणावर पुरवठा होतो.

गावठी दारु विक्रेत्यांची राज्य उत्पादन शुल्क पथकावर दगडफेक
धाडसत्र : तिघांविरुध्द गुन्हे दाखल
वरुड : मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर गावठी दारु तयार करणारे मोठे कारखाने असून वरुड, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यात मोठया प्रमाणावर पुरवठा होतो. दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागा मोर्शीच्या पथकाने सिमावतीर् भागात धाडसत्र राबवून तलोटी, धामणधस, पांढरघाटी, पळसोना, पुसला, करजगाव (गांधीघर) येथे धाडसत्र राबवून ४५ हजार रुपयाचा गावठी दारु आणि मोहासडवा जप्त केला. यामध्ये ५०० लिटर हातभट्टी दारु आणि ३०० लिटर मोहा सडव्याचा समावेश आहे. धाडसत्र राबवितांना कुूंमूदरा परिसरात गेले असता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर दगडफेक सुध्दा करण्यात आली. यामध्य े तिधांना अटक करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्याला मध्य प्रदेशची सिमा लागून असून सातपूडा पर्वत असून जंगल परिसर आहे. नेमका या जंगलाचा फायदा घेत चांदूरबाजार, मोर्शी , वरुड तालूकयाच्या सिमावतीर् भागात मोठया प्रमाणावर गावठी दारुची निर्मीती करणारे कारखाने आहे. महाराष्ट्रातीलच लोकांचे मध्यप्रदेशात कारखाने असून तेथून दिवसागणिक हजारो लिटर गावठी दारुचा पुरवठा या तालूक्यातील गावांना केला जातो. यामध्ये शिरसगांव पोलीस ठाण्या अंतर्गत पातकुबेत, कुमई, सोनोरा,देवूरवाडा, शिरसगांव कसबा, कोंडवर्धा, सर्फापूर, करजगाव, चांदूरबााजर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हद्दीत माधान, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा, बेलमंडई, वेणू बेलखेडा, गौरखेडा, मोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावामध्ये मध्य प्रदेशातील झूनकारा,भारुडा, पटना,बापकाटा, अर्धमानी, नवा मानी, बेनोडा पोलीस ठाण्या अंतर्गत तलोटी , धामनधस, पांढरघाटी, पळसोना, करजगांव, बेनोडा, मध्यप्रदेशातील पाणझरी, गोनापूर, मालेगांव ,घाना उमरी, पट्टन, पांढरी येथून शेंदूरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सातनूर, रवाळा, पुसली, खापरखेडा, पुसला, वरुड पोलीस ठाण्यांतर्गत लिंगा, सावंगी, गणेशपूरसह आदी गावात गावठी दारु चा पुरवठा केला जातो. दोन दिवसापूवीर् राज्यउत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक निरीक्षक निरीक्षक रंधवे, मोर्शी विभागाचे निरीक्षक शरद लांडगे, दुय्यम निरीक्षक राजेश तायकर, संजय देशमुख, शिपाई गोरे , गावंडे, जयस्वाल, चव्हाण, पाटील यांच्या पथकाने ध्तलोटभ कुमूंदरा आणि इसंब्री , पुसला, करजंगाव(गांधीघर ) येथे धाडसत्र राबवलिे असता ५०० लिटर गावठी दारु आणि ३०० लिटर मोहाचा सडवा जप्त केला. यामध्ये मंगलू भुस्सा परतेती रा. तलोटी, बाबाराव रामसिंग मरस्कोल्हे रा.कुमंदरा, विनोद सुभाष कुडसिंगे रा. इसंब्री याला अटक केली आहे. कुमूंदरा येथे धाडसत्र राबवितांना पर्वताच्या माथ्यावरुन दगडफेक केली. यामध्ये भरारी पथकाच्या एका जवानाला दगड लागल्याने जखमी झाल्याची घटना धडली.
मध्य प्रदेश महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त धाडसत्र राबवून गावठी दारु निर्मिती कारखाने उद्ध्वस्त केले. दोन्ही राज्याच्या पोलिसांना संयुक्त कारवाईची विनंती करू.
- शरद लांडगे,
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक.