चिखलदºयात ग्राहकांनीच तपासले पेट्रोल पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:26 IST2017-08-10T23:25:48+5:302017-08-10T23:26:42+5:30
चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर अव्वाच्या सव्वा दरात इंधन विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमिवर व्हिजन इंटिग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने .....

चिखलदºयात ग्राहकांनीच तपासले पेट्रोल पंप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर अव्वाच्या सव्वा दरात इंधन विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमिवर व्हिजन इंटिग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने गुरूवारी ग्राहक, पर्यटकांनी पेट्रोल तपासणी केली. यावेळी पेट्रोल प्रतीलिटर सात ते आठ तर डिझेल चार ते पाच रूपये चढ्या दराने विकले जात असल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन देऊन पेट्रोल पंपाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.
पेट्रोल पंपावर ग्राहकांना आवश्यक सुविधा असाव्यात, हा नियम आहे. तथापि चिखलदºयातील आर. के.पेट्रोल पंपावर ग्राहक, वाहन चालकांसाठी कोणत्याही सोई-सुविधा नसल्याची तक्रार तहसीलदारांकडे व्हीआयडीएचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी केली.
ग्राहकांना सुविधांचा अभाव
अमरावती :अन्य पेट्रोल पंपांच्या तुलनेत आर.के. पेट्रोल पंपावर अतिरिक्त दराने इंधन विकले जात असल्याचा आरोप करण्यात आला. इंधन मशिनमध्ये तांत्रिक बिघाड, भेसळयुक्त पेट्रोल मिळत असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकांशी निगडीत कोणत्याही सुविधा नसल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रितेश वाघमारे, मनीष आडे, शेख नुरुद्दीन, शेख अलिम, दीपाली नरुले, सागर चव्हाण, सागर पाल, राहुल ऊईके आदींनी तहसीलदारांना निवेदन देऊन पेट्रोल पंप संचालकाविरुद्ध कारवाईची मागणी केली.