ट्रकखाली आल्याने व्यक्तीचा हात निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:43+5:302021-02-13T04:14:43+5:30
दर्यापूर बसथानकाजवळील घटना : मोठी घटना टळली दर्यापूर : बसथानकाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला ट्रकने धडक दिली. त्यात ...

ट्रकखाली आल्याने व्यक्तीचा हात निकामी
दर्यापूर बसथानकाजवळील घटना : मोठी घटना टळली
दर्यापूर : बसथानकाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला ट्रकने धडक दिली. त्यात ट्रकचे चाक हातावरून गेल्याने त्या व्यक्तीचा एक हात पूर्णपणे निकामी झाला. येथील बसस्थानकासमोर शुक्रवारी दुपारी २च्या सुमारास ही घटना घडली. राजू देवराव खंडारे (४६, रा. थिलोरी) असे जखमीचे नाव आहे.
आर.जे. ११ जि. बी २८५० या ट्रकने धडक दिल्याने खाली कोसळून खंडारे यांच्या हातावरून ट्रकचे चाक गेले. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु नागरिकांनी ट्रकचालकाला धरून चांगला चोप दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळावरून नागरिकांनी अपघात झालेल्या व्यक्तीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता तत्काळ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रक व चालकास ताब्यात घेतले. या घटनेने नुकत्याच झालेल्या एका महिलेच्या अपघाताची आठवण करून दिली.