'पर्सनल चॅट' किती पर्सनल?
By Admin | Updated: July 5, 2015 00:19 IST2015-07-05T00:19:17+5:302015-07-05T00:19:17+5:30
आज इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

'पर्सनल चॅट' किती पर्सनल?
प्रमाण वाढले : इंटरनेट जीवनाचा अविभाज्य अंग
अमरावती : आज इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. युवापिढी तर या इंटरनेटच्या एवढे आहारी गेले आहे की, त्यांच्या अनेक खासगी गोष्टही ते इंटरनेटवर सर्रास चॅट करीत असतात. पण ते प्रत्यक्षात किती खासगी रहाते, हा खरा प्रश्न आहे.
आपण ज्यांना ओळखत नाही, त्यांच्याशी व्हिडिओ चॅटिंग करणे असुरक्षित आहे, हे सर्वांना कळते. पण तरुणाई अनोळखी व्यक्तीशी वैैयक्तिक बाबी चॅट करीत असते. यामुळे अनेकदा फसवणुकीचे गुन्हेही घडले आहेत. मात्र, अनोळखी सोडाच पण आपले मित्र, नातेवाईक ज्यांना आपण अगदी जवळचे मानतो त्यांच्याशीही चॅटद्वारे खासगी आयुष्यातील अंतरंग उलगडणे धक्कादायक असू शकते.
यू-ट्यूब व्हिडिओने उघडले डोळे
यू-ट्यूब चॅनलने २२ जून रोजी इंटरनेटवर असा एक व्हिडिओ अपलोड केला, जो पाहून इंटरनेट युजर्सचे डोळे उघडले पाहिजे. या व्हिडीओला आजपर्यंत १५ लाख नेट युजर्सने पाहिले आहे. सुमारे साडेतीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये असे दाखविले की, एक युवती आपल्या मित्रासोबत व्हिडीओ चॅटिंग करीत असते. चॅटिंग करता-करता असे लक्षात येते की, त्या दोघांमध्ये काही तरी बिनसले आहे. मित्र त्या युवतीवर नाराज झाला आहे. ती युवती आपल्या मित्राची नाराजी दूर करण्यासाठी कॅमेरा समोर स्ट्रिपिंग, म्हणजेच कपडे उतरविण्यास तयार होते. व्हिडीओत त्या युवतीचा आवाज ऐकू येतो की, मला हे अजिबात योग्य वाटत नाही. मात्र, आपल्या मित्राच्या आनंदासाठी मी हे करीत आहे.
जास्त इमोशनल नका होऊ!
१५ लाख नेट युर्जसने हा धक्कादायक प्रकार पाहिला आहे. यावरुन आपण समजतो तेवढे खासगी चॅट करणे सोपे नाही. आपले आयुष्य बरबाद करण्यासाठी असे चॅट पुरेसे असतात. आभासी जगात प्रत्येक ओळखीच्या, अनोळखी व्यक्तींशी जोडण्यास इंटरनेट मदत करते. पण इंटरनेटवरील संवाद, व्हिडीओही घातक ठरू शकते. भविष्यात कधी इंटरनेटवर चॅटिंग कराल तर भान ठेवा. अशी चूक वारंवार करू नका.