विजयी रॅलीसाठी लागणार परवानगी
By Admin | Updated: May 15, 2014 23:07 IST2014-05-15T23:07:26+5:302014-05-15T23:07:26+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊनसह ठिकठिकाणी ५00 पोलीस ..

विजयी रॅलीसाठी लागणार परवानगी
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊनसह ठिकठिकाणी ५00 पोलीस कर्मचारी-अधिकार्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होताच विजयी उमेदवाराकडून मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक काढण्यासाठी उमेदवारांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी नसल्यास मिरवणूक काढता येणार नसल्याचे मत गुरुवारी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी लोकमत शी बोलतांना व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी नेमाणी गोदाम येथे शुक्रवार (ता.१६) राजी पार पडणार आहे. मतमोजणीदरम्यान बडनेरा- अमरावती मार्ग काही अंतरापर्यत बंद ठेवण्यात आला आहे. तेथील वाहतूक दुसर्या मार्गाने वळविण्यात आली आहे. नेमाणी गोदामापासून १00 मीटर अंतरावर मोठय़ा प्रमाणात बॅरीगेट्स लावण्यात येणार आहे. या १00 मीटरच्या आत वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १00 मीटर बाहेर स्वतंत्र वाहनतळ तयार करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान सीआरपीएफचे सशस्त्र जवान नेमाणी गोदामात तैनात राहणार आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान नागरिकांनी शहरात शांतता ठेवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी केले आहे. (प्रतिनिधी)