शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ’ कामगिरी बजावा अन्यथा अनुदानाला ब्रेक!; पालिका, महापालिकांना तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:22 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे कचरा विलगीकरण अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यात येणार आहेत. नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयावर शासनाने शिक्कामोर्तब केले असून कचरा विलगीकरणाची कार्यवाही न करणाºया शहरांच्या अनुदानाला ब्रेक लावण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानात समाजातील सर्व घटकांतील लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता देशभरातील ४०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ राबविण्यात येत आहे. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘अमृत’ व ‘नॉन अमृत’ गटातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येणार आहे. मात्र या अभियानांतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करताना काही शहरांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे निरीक्षण राज्य सरकारने नोंदविले आहे. त्या पार्श्वभूमिवर अशा शहरांना योग्य गतीने कार्यप्रवण करण्यासाठी आणि अन्य शहरांना उद्दिष्ट्य साध्य करण्यास चालना मिळावी, यासाठी ‘अनुदान’ थांबविण्याची कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमिवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत एप्रिल २०१८ अखेरपर्यंत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी किमान ८० टक्के कचऱ्याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करणे अनिवार्य केले आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये चांगला गुणानुक्रम मिळविणे अनिवार्य आहे. निर्मितीच्या जागीच विलगीकरण केलेल्या कचऱ्यापासून एप्रिल २०१८ अखेरपर्यंत केंद्रीय पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी तंबीच नगरविकास विभागाने महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना दिली आहे. या तीनही घटकांवर सकारात्मक काम न करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनस्तरावरून प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनुदान थांबू नये, यासाठी या संस्थांना ‘काम’ करून दाखविण्याचे आव्हान एप्रिलपर्यंत पेलायचे आहे.कचरा विलगीकरणाची कार्यवाही न करणाऱ्या व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये योग्य कामगिरी न करणाऱ्या ‘यूएलबी’ची प्राधान्याने देण्यात येणारी अनुदाने थांबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.- सुधाकर बोबडे, उपसचिव, महाराष्ट्र शासन

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान