रेल्वे स्टेशनवर वाहने लावणारे नागरिक म्हणतात, नको रे बाबा
By Admin | Updated: October 9, 2015 00:48 IST2015-10-09T00:48:41+5:302015-10-09T00:48:41+5:30
चार दिवसांपासून अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावण्याच्या बेशिस्त वाहनचालकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाईचा सपाटा...

रेल्वे स्टेशनवर वाहने लावणारे नागरिक म्हणतात, नको रे बाबा
कारवाईची धास्ती : नागरिकांना लागली शिस्त
अमरावती : चार दिवसांपासून अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावण्याच्या बेशिस्त वाहनचालकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावल्यामुळे नागरिक म्हणतात, नो पार्किंग झोनमध्ये नको रे बाबा नको, अखेर 'लोकमत'च्या दणक्याने नागरिकांना शिस्त लागली आहे. आगामी होऊ घातलेल्या नवरात्र उत्सावानिमित्त अंबानगरीचे वैभव असलेल्या मॉडेल रेल्वेस्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावणे चुकीचे आहे.
काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवालही सभ्य व जबाबदार नागरिक विचारत आहेत. ठेकेदारांची नो-पार्किंग झोन मध्ये जाऊन पठाणी वसुली रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे बंद झाली तर चार डझन वाहनांवर रेल्वे पोेलिसांनी कारवाई केल्यानंतर हा मॅसेज अमरावतीकरांमध्ये गेला. जर वाहने नो-पार्किंग झोनमध्ये लावली तर कारवाई होते. तसे रेल्वे पोलीस येथे तैनात असल्यामुळे गुरुवारी पार्किंग झोनमध्ये शुकशुकाट होता. नागरिकांना अधिकृत पार्किंग झोनमध्ये वाहने लावण्याची शिस्त लागल्यामुळे ठेकेदारांनीसुध्दा या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्य उत्पन्नातही वाढ झाल्याचे समजते. आरपीएफचे निरीक्षक सी.एच. पटेल यांनी लोकमतचे आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)