भरदिवसा लुटणाºया युवकाला लोकांनी बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:06 PM2017-08-21T22:06:07+5:302017-08-21T22:06:51+5:30

मारहाण करून लूटमार करणाºया एका युवकाला नागरिकांनी बदडल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मॉडेल रेल्वेस्थानक परिसरात घडली.

People have been kidnapped for the day's looting | भरदिवसा लुटणाºया युवकाला लोकांनी बदडले

भरदिवसा लुटणाºया युवकाला लोकांनी बदडले

Next
ठळक मुद्देरेल्वे स्थानकानजीकची घटना : अन्य दोघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मारहाण करून लूटमार करणाºया एका युवकाला नागरिकांनी बदडल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मॉडेल रेल्वेस्थानक परिसरात घडली. लूटमार करणाºयांपैकी दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी आरोपी रवि किसन खडसे (३०,रा.बेलपुरा) व तक्रारकर्ता कलीम खान अलीम खान (३५, चांदनी चौक) या दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कलीम खान अलीम खान (३५) हा युवक बसस्थानक मार्गावरील अलकरीम हॉटेलमध्ये काम करतो. सोमवारी तो मर्च्युरी पॉईन्टकडून रेल्वे स्थानक मार्गाने जात असताना त्याला रवि किसन खडसे याने स्थानिक गजानन महाराज मंदिरीसमोर अडविले व रेल्वेस्थानक परिसरातील झुडूपात ओढत नेले आणि लूटमार केली.
रविने १६ आॅगस्ट रोजीही केली लूटमार
त्याठिकाणी रवि खडसे व त्याच्या दोन साथीदारांनी कलीमला बेदम मारहाण सुरू केली आणि त्याच्या खिशातून दोन हजार रूपये व मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. हा प्रकार बघून परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रवि खडसेसह त्याच्या दोन्ही साथीदारांनी पलायन केले. काही नागरिकांनी रवि खडसेचा पाठलाग करून त्याला मॉडेल रेल्वेस्थानकाच्या गेटजवळच पकडले आणि मारहाण सुरु केली. या मारहाणीत रवि खडसे जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला. हा गोंधळ पाहून रेल्वे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाºया नागरिकांना थांबविले.
रेल्वे पोलिसांनी रवि खडसेला ताब्यात घेऊन तत्काळ कोतवाली पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच कोतवाली पोलीस ठाण्याच्या पीएसआय सुनीता काळे, पोलीस शिपाई पंकज खटे, संजय सांबळे व सुधीर भोरे यांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतले. तत्काळ उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. यावेळी रविद्वारे करण्यात आलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कलीमला सुद्धा उपचारासाठी इर्विनमध्ये आणले गेले. याप्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरु होती. रवि खडसे हा लुटमार करीत असल्याची तक्रार १६ आॅगस्ट रोजी रोमील प्रभाकर बनचैर्य (२६,रा. राजापेठ) याने दिली आहे.

Web Title: People have been kidnapped for the day's looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.