लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती पेंडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:35+5:302020-12-11T04:38:35+5:30
अमरावती : मर्यादित स्पर्धात्मक विभागाीय परीक्षा जिल्हा परिषदेतील विविध कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीसाठी नियमितपणे स्पर्धात्मक परीक्षा ...

लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती पेंडिंग
अमरावती : मर्यादित स्पर्धात्मक विभागाीय परीक्षा जिल्हा परिषदेतील विविध कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीसाठी नियमितपणे स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. परिणामी असे कर्मचारी अद्याप पदोन्नतीपासून वंचित आहेत. त्यामुळे वरील परीक्षा नियमित घेण्याची मागणी झेडपी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार, जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक, भांडार सहायक, भांडारपाल किंवा कॉम्युटर या पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीसाठी परीक्षा घेण्याचे निर्देश आहेत. सदर परीक्षा या विभागीय स्तवरावर दरवर्षी नोव्हेबर, डिसेंबर या महिन्यात विभागीय आयुक्तांनी यांनी घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र चार ते पाच वर्षांपासून अशा प्रकारच्या परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात झेडपी लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून ही बाब निदर्शनास आणून दिली. वरील परीक्षा न घेतल्यामुळे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया थांबविण्यात आली. पर्यायाने रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वरील पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नती परीक्षा तातडीने घेऊन लिपिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत निर्णय न घेतल्यास लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना आंदोलन करेल असा इशाराही यापत्रात दिला आहे.
कोट
राज्यातील सहा विभागात झेडपीमध्ये कनिष्ठ सहायक व अन्य पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीसाठी नियमिपणे परीक्षा घेतली नाही. हा या कर्मचाऱ्यावर अन्याय आहे. याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा कर्मचारी हितासाठी आंदोलन छेडू
- गिरीश दाभाडकर,
राज्याध्यक्ष, झेडपी लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना
.