शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पेंच, ताडोबा जंगल सफारी १ जुलैपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:14 AM

राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल.

ठळक मुद्देवनउद्याने पुढील टप्प्यात सुरू होणार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचेही नियोजन

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनमुळे बंद असलेली पेंच, ताडोबातील जंगल सफारी १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर वनउद्याने, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचे नियोजन वनविभागाने आखले आहे.कोरोनाच्या उद्रेकानंतर मार्चपासून वनउद्याने, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात पर्यटकांना मनाई आहे. लॉकडाऊनच्या काळात व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करीत सम-विषम तारखांना बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वनविभागानेसुद्धा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होईल. त्यानंतर मेळघाट, वर्धा येथील बोर अभयारण्य, मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री, यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्य, अमरावती येथील बांबू गार्डन सुरू होणार आहे.वनविभागाला कोट्यवधींचा फटकालॉकडाऊनमुळे पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी बंद असल्यामुळे गत तीन महिन्यांत वन विभागाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले आहे. येथे वाघांचे दर्शन व निसर्ग अभ्यासासाठी विदेशी पर्यटकांची होणारी गर्दी थांबली आहे. जंगल सफारीमुळे स्थानिकांनासुद्धा रोजगार मिळतो; पण तोदेखील बंद झाला आहे. आता १ जुलैपासून जंगल सफारी सुरू होत असल्याने पुन्हा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात रेलचेल वाढणार आहे.मेळघाटात जंगल सफारीवर भरमेळघाट व्याघ्र प्रकल्पात पेंच, ताडोब्याच्या तुलनेत पर्यटकांची संख्या नगण्य आहे. आता मेळघाटात जंगल सफारी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता मेळघाटात चार हत्ती आणले आहेत. लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीचे निर्बंध असून, ते हटताच मेळघाटात जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.१ जुलैपासून पेंच, ताडोबा येथे जंगल सफारी सुरू होत आहे. कोरोना नियमावलीचे पालन करूनच पर्यटकांना जंगलात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर मेळघाटसह अन्य अभयारण्य, वनउद्याने सुरू होतील.- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प