गुन्हे शाखेतील ‘त्या’ १९ कर्मचार्‍यांना दंड

By Admin | Updated: May 23, 2014 23:30 IST2014-05-23T23:30:36+5:302014-05-23T23:30:36+5:30

शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण शाखा व दोन पोलीस ठाण्यांतील डिटेक्शन पथकात कार्यरत ३८ कर्मचार्‍यांच्या कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करीत त्यांना पोलीस उपायुक्तांनी कारणे दाखवा

Penalties for 19 employees in crime branch | गुन्हे शाखेतील ‘त्या’ १९ कर्मचार्‍यांना दंड

गुन्हे शाखेतील ‘त्या’ १९ कर्मचार्‍यांना दंड

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण शाखा व दोन पोलीस ठाण्यांतील डिटेक्शन पथकात कार्यरत ३८ कर्मचार्‍यांच्या कामगिरीबद्दल असमाधान व्यक्त करीत त्यांना पोलीस उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटिशी बजावल्या होत्या. पाच दिवसानंतरही बाजू मांडण्यात असमर्थ ठरल्याने या कर्मचार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा अल्टिमेटम् स्पष्टीकरणासाठी देण्यात आला होता. गुन्हे शाखेतील १९ कर्मचार्‍यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या, जबरी चोर्‍या, घरफोड्या तसेच दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. शहर पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात डिटेक्शन पथक नेमण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी व गुन्हे शाखेचे कर्मचारी शहरात गस्त करीत असतानाही हे प्रकार सुरूच असल्याने काही कर्मचार्‍यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले. गुन्हे शाखेत एकूण ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी २१ आणि राजापेठ व शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील डिटेक्शन पथकात कार्यरत १७ कर्मचार्‍यांवर ठपका ठेवून पोलीस उपायुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. गुन्हे शाखेतील १९ कर्मचार्‍यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या कर्मचार्‍यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

Web Title: Penalties for 19 employees in crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.