‘किसान ॲप्रचे वरातीमागून घोडे; वादळवारे येऊन गेल्यावर अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:38+5:302021-05-27T04:13:38+5:30
अमरावती : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने किसान ॲप विकसित केले असले तरी हे ॲप म्हणजे ...

‘किसान ॲप्रचे वरातीमागून घोडे; वादळवारे येऊन गेल्यावर अलर्ट
अमरावती : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने किसान ॲप विकसित केले असले तरी हे ॲप म्हणजे असून-नसून खोळंबा, अशी स्थिती आहे. बहुतांश शेतकऱ्यांसह शासनाचे काही विभागदेखील या ॲपचा उपयोग करीत नसल्याचे दिसून आलेले आहे.
या ॲपवर शेतकऱ्यांना वेळेवे हवामान, अवकाळी पाऊस, पीक पेरणी, तसेच विविध कृषी योजनांची माहिती दिल्या जाते. शेतकऱ्यांना ज्यावेळी खरी ााआवश्यकता असते त्यावेळी हवामान बदलाची माहिती उशीरा दिल्यात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी टेक्नोसॅव्ही व्हावा व त्याद्वारे अधिकाधिक योजनांची माहिती त्यांना व्हावी, याकरिता कृषी विभागाद्वारा सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे. तसे पाहता काही प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभही होत आहे. ॲन्ड्राईड मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत शेतकऱ्यांच्या यशोगाथादेखील पाहावयास मिळत आहे.
याचसोबत शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहितीदेखील तेवढीच महत्वाची आहे. मात्र, याॲपवर अनेकदा उशिराने माहिती मिळत आहे. वादळ, पाऊस, हवामान बदल आदींची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेत मेसेज येणे महत्त्वाचे आहे. मात्र, या किसान ॲपद्वारे सध्यातरी हा उद्देश सफल झाल्याचे दिसत नाही.
बॉक्स
किसान ॲपवरूनही मिळते माहिती
* किसान ॲपवरून हवामान, वादळ, अवकाळी पाऊस, पीक पेरणी आदी माहिती मिळते.
* प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, पीकविमा, पीककर्जाचीदेखील माहिती शेतकऱ्यांना मिळते.
* शेतीविषयक शासनाच्या योजना, अनुदाने, अर्ज प्रक्रिया याची माहिती देण्यात येते
बॉक्स
माहिती वेळेत मिळाल्यास फायदा
* शेती, हवामान बदल, वादळ याची माहिती वेळेत मिळाल्यास शेतकरी अलर्ट होतील
* शेतीविषयक अपडेट वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल
* खरिप हंगामाच्या अनुषंगाने महत्वाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी.
बॉक्स
अन्य ॲपद्वारे त्वरित माहिती
शेतकरी ॲपचा वापर शेतकरी फारसा करीत नाही. हे ॲप लेटलतीफ आहे. याच्यापेक्षा काही खासगी कंपन्या, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान, अनुसंधान केंद्रांचे ॲप शेतकऱ्यांना अचूक माहिती देत असल्याने शेतकरी किसान ॲपपेक्षा या ॲपचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
कोट
किसान ॲप म्हणजे असून नसून खोळंबा
किसान ॲपचा सुरुवातीला वापर केला. मात्र, फारसा फायदा झालेला नाही. याशिवाय खासगी व कृषी विभागाचे अन्य ॲप महत्त्वाचे आहेत, त्याद्वारे नियमित माहिती मिळते.
- रावसाहेब खंडारे,
भातकुली
कोट
या ॲपवर विसंबून राहता येत नाही. या ॲपचा फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी हमखास माहिती देणारे ॲप विकसित करावे.
- भूषण देशमुख,
चांदूरबाजार