कु-हा पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:48+5:302021-03-29T04:07:48+5:30
कु-हा : होळी, धूलिवंदन, शिवजयंती तसेच मुस्लिम बांधवांचा शब्बे बरात या संबंधात २७ मार्च रोजी कु-हा पोलीस ठाण्यात सायंकाळी ...

कु-हा पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा
कु-हा : होळी, धूलिवंदन, शिवजयंती तसेच मुस्लिम बांधवांचा शब्बे बरात या संबंधात २७ मार्च रोजी कु-हा पोलीस ठाण्यात सायंकाळी ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा घेण्यात आली. कोविड १९ नियमांचे पालन करून होळी सण व धूलिवंदन चौकाचौकांत शांततेने व साध्या पद्धतीने साजरा करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. शिवजयंती कार्यक्रमसुध्दा मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने पार पाडावा. मुस्लिम बांधवांचा शब्बे बरात कार्यक्रमसुध्दा साध्या पद्धतीने शांततेत साजरा करण्यात यावा, असे ठाणेदार वर्गे यांनी सांगितले. यावेळी शांतता समितीचे सदस्य सै. रफिक भाई, विजय डहाके, अब्दुल सत्तार, अशोक पवार, दिगांबर दमाये, शहजाद पटेल, रामेश्वर पचगाडे, कल्याण बेहरे, म.हारूण, अ.अजीज, सै.निसार भाई, सै.एजाज, राजाभाऊ बाभुळकर उपस्थित होते.
----------