बनावट पीआर कार्ड प्रकरणातील आरोपींना ३० जूनपर्यंत पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST2021-06-27T04:10:15+5:302021-06-27T04:10:15+5:30
अमरावती : बोगस पीआर कार्ड प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह दोघांना प्रथम श्रेणी दंडाधिकारी कोर्ट क्रमांक १० न्यायालयासमोर हजर केले असता, ...

बनावट पीआर कार्ड प्रकरणातील आरोपींना ३० जूनपर्यंत पीसीआर
अमरावती : बोगस पीआर कार्ड प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह दोघांना प्रथम श्रेणी दंडाधिकारी कोर्ट क्रमांक १० न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३० जूनपर्यंत पाच दिवसाची पोलीस कठोडी सुनावली.
मुख्य सूत्रधार प्रॉपर्टी ब्रोकर संदीप चंद्रकांत राठी (४७, रा. एलआयसी कॉलनी), प्रकाश विठोबा ठाकरे (६०, रा. गुरुदेवनगर, मोझरी ता. तिवसा) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील कॅम्प परिसरातील ७ हजार ९८ वर्गफूट भूखंडाचे भूमिअभिलेख कार्यालयातून बोगस पीआर कार्ड तयार करून त्याच पीआर कार्डच्या आधारे कोट्यवधींचा भूखंड विकला. या प्रकरणात आणखी काही आरोपींचे नाव पीसीआ दरम्यानसमोर येण्याची शक्यता आहे. या भूखंडाचे मूळ मालक महिला असून, त्या महिलेनेच फेब्रुवारी २०२१ मध्ये पीआर कार्ड काढला असता, हा भूखंड विठोबा ठाकरे यांच्या नावे असल्याचे लक्षात आल्याने प्रकरणाचे बिंग फुटले. त्यानंतर महिलेने भूमिअभिलेखाकडे तक्रार नोंदविली. कार्यालयातील दोन कनिष्ठ लिपिकांवर बोगस पीआर कार्ड बनवल्याचा ठपका ठेवून त्यासंदर्भाचा अहवाल उपअधीक्षक भूमीअभिलेख यांनी गाडगेनगर पोलिसांकडे सादर केला. त्याआधारे ८ जून रोजी भूमिअभिलेखाच्या दोन कनिष्ठ लिपिकांवर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय वर यांनी केला असता, या प्रकरणात दोन लिपिकांसह मुख्य सूत्रधार ब्रोकर संदीप राठी असल्याचे निष्पन्न झाले. प्रकाश ठाकरे हा शेतमजूर व स्वयंपाकी करण्याचे काम करतो. मात्र, संदीपनेच ठाकरेला या भूखंडाचा मालक बनविल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.