प्रचलित ५० पैशांच्या निकषाप्रमाणे होणार पैसेवारी जाहीर
By Admin | Updated: September 27, 2015 00:03 IST2015-09-27T00:03:33+5:302015-09-27T00:03:33+5:30
खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारीचे जाहीर करण्याबाबतच्या सूचना शासनाने मागे घेतल्या आहेत

प्रचलित ५० पैशांच्या निकषाप्रमाणे होणार पैसेवारी जाहीर
शासन निर्देश : ६७ पैशांपेक्षा कमी-जास्त पैसेवारीचे निकष मागे
लोकमत विशेष
अमरावती : खरीप पिकांची ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारीचे जाहीर करण्याबाबतच्या सूचना शासनाने मागे घेतल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक प्रचलित नियमाने खरीप पिकांसाठी जिल्ह्याची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
दरवर्षी खरीप पिकांची नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर केली जाते. यावर्षी मात्र १९ सप्टेंबरला खरीप पिकाची पैसेवारी शासनाने १६ सप्टेंबरला पत्रानुसार ६७ पैशांपेक्षा कमी किंवा जास्त याप्रमाणात जिल्ह्यात ५९ पैसे काढण्यात आली होती.
या निकषानुसार जिल्ह्यातील १ हजार ९८१ या महसुली गावांची ही नजर अंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जाहीर केली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी शासनाने ६७ पैशांपेक्षा जास्त व कमी उत्पन्न हे आदेश मागे घेतले व पूर्वीप्रमाणेच ५० टक्क्यापेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पेैसेवारी जाहीर करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यामुळे यापूर्वी १९ सप्टेंबरला जाहीर झालेली ५९ पैसेवारी ही आता जुन्याच ५० टक्क्यापेक्षा कमी किंवा जास्त या निकषाप्रमाणे होणार आहे. (प्रतिनिधी)
अशी काढणार पुन्हा नजर अंदाज पैसेवारी
५० पैशापेक्षा कमी किंवा जास्त नजर अंदाज पैसेवारी काढण्यासाठी पुन्हा एकदा महसूल अधिकाऱ्यांना रँडम पध्दतीने फ्लॅट निवडून, प्रमुख पिकाकरिता प्रत्येक गावामध्ये किमान १२ भूखंड निवडून त्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याव्दारे खरीप पिकांच्या पैसेवारीचा अंदाज काढला जातो.
१९ सप्टेंबरची अंदाज पैसेवारी
जिल्ह्यात १९ सप्टेंबरला १९८१ गावात ५९ पैसे ही नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार अमरावती तालुक्यात ६१ पैसे, भातकुली ६०, नांदगावत ५७, चांदूरररेल्वे ५४, धामगणाव ६१, तिवसा ६१, मोर्शी ६५, वरूड ५९, अचलपूर ५६, चांदूरबाजार ५७, दर्यापूर ६२, अंजनगाव ५८, धारणी ५४ व चिखलदरा तालुक्याची ५७ पैसेही नजरअंदाज पैसेवारी रद्द होऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा जास्त अशी काढण्यात येणार आहे.