शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

पवन महाराजाच्या आई-वडिलांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:21 IST

अंगात देव येत असल्याचे सोंग करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराजाच्या आई-वडिलांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरात तीन तलवारी सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४/२५ आर्म्स अ‍ॅक्टचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज पसार झाला असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ठळक मुद्देबयाण नोंदविले : आर्म्स अ‍ॅक्टचाही गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगात देव येत असल्याचे सोंग करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराजाच्या आई-वडिलांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरात तीन तलवारी सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४/२५ आर्म्स अ‍ॅक्टचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज पसार झाला असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.मागील तीन वर्षांपासून कांतानगरातील शासकीय वसाहतीत पवन घोंगडे महाराज याचे कारनामे सुरू आहेत. अष्टमी, अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी घोंगडे महाराज देव अंगात आल्याचे सोंग करायचा. साडी नेसून अंगाला हळदी-कुंकवाचे टिळे लावून देवाचा अंगात संचार असल्याचा आव आणत अंधश्रद्धा पसरवित होता. धार्मिक भावनेतून अनेक अंधश्रद्धाळू या भोंदूबाबाशी जुळत होते. त्याचे विविध प्रताप पाहून तेथील रहिवाशांची तळपायाची आग मस्तकात जायची. मात्र, कोणी बोलले की, पवनसह त्याचे आई-वडील नागरिकांच्या अंगावर धावून जायचे. अनेकदा तेथील रहिवाशांचे घोंगडे कुटुंबीयांशी वाद झाले. पोलिसांपर्यंत पोहोचले तरी त्यांची पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही.गाडगेनगर पोलिसांची टाळाटाळघोंगडे महाराजासमोर नतमस्तक होणाºया अंधश्रद्धाळूंचा जमावडा, होमहवन, जोरजोरात ओरडणे, भूत उतरविणे आदी प्रकारांची सवयच तेथील नागरिकांना झाली होती. पोलीस कारवाई करीत नव्हते. भोंदूबाबा पवन महाराजसोबत शेकडो अंधश्रद्धाळू जुळल्यामुळे त्याच्या भक्तांनी व चेल्यांनीही नागरिकांसोबत हुज्जतबाजी सुरू केली होती. दररोज अंधश्रद्धाळूंची संख्या वाढतच होती. पवन महाराजाचा लोकदरबार भरतच होता. त्यामुळे नागरिक अक्षरशा: वैतागले होते. अखेर या भोंदूबाबाच्या प्रतापांना वैतागून तेथील नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतले. त्यांनी दखल घेत गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. तरीसुद्धा पोलिसांनी फारसे लक्ष दिले नाही. महिना लोटत असतानाच कारवाई होत नसल्याचे पाहून नागरिकांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजाचा शोध सुरू केला आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.गुन्हा दाखल झाल्यानंतरही भरला पवन महाराजाचा दरबारअमरावती : अंधश्रद्धा पसरविणाºया पवन महाराजाविरुद्ध कांतानगर रहिवासी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून १५ मे रोजी पहिली तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पवन घोंगडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अटक केली नाही. पोलिसांना त्याच्या घरी पाठविण्यात आले तेव्हा ‘दरबार’ भरला होता. १६ जून रोजी पुन्हा रहिवाशांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी हालचाल सुरू केली. यावरून गाडगेनगर पोलीस कितपत ‘कर्तव्यदक्ष’ आहेत, ही बाब दिसून येते. महिनाभर गाडगेनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला नाही. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ अ‍ॅक्शन घेत पवन महाराजचे घर गाठले आणि घराची झडती घेतली. त्यातच जप्तीही अर्धवट केली. हा प्रकार आरोपी पवन महाराजाला पाठीशी घालण्याचा असून, ठाणेदार मनीष ठाकरे यांनी चौकशी का होऊ नये, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.ती आलमारी कधी उघडणारपवनच्या घरातील आलमारीत तंत्र-मंत्राचे काही साहित्य असल्याची शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. घरझडतीत नेमकी तीच कुलूपबंद आलमारी पोलिसांनी तपासली नाही. ती आलमारी उघडली, तर जादुटोण्याविषयीची काही पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.पूजाअर्चेचे साहित्य जप्तपवनच्या घरझडतीत पोलिसांनी पूजाअर्चेचे साहित्य जप्त केले. त्यामध्ये खारका-बदामा, राळ, उद, ४४ कवड्यांचे दोन हार, मोरांचे पंख यांचा समावेश आहे.आर्म्स अ‍ॅक्टचा गुन्हापवन घोंगडेच्या घरातून पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम २ (क), २(घ), ३ व ४/२५ आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.पवन महाराज मुंबईलापवन घोंगडे हा तरुण वयात महाराज बनून देव अंगात येण्याचे नाटक करीत आहे. त्याच्या आई-वडिलांनी पवन हा स्पर्धा परीक्षेसाठी मुंबईला गेल्याचे पोलिसांना सांगितले. आता तेथे जाऊन पोलीस ताब्यात घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.तत्कालीन एसीपींची भेटपवन घोंगडेच्या भोंदूगिरीने झालेल्या त्रस्त झालेल्या नागरिकांनी वर्षभरापूर्वी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावेळी तत्कालीन एसीपी चेतना तिडके यांनी कांतानगरातील शासकीय वसाहतीत जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी पवन महाराजांची आराधना करणारे अनेक अंधश्रद्धाळू उपस्थित होते. मात्र, त्यानंतरही पवनविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.भोंदूगिरी करणारा आरोपी अद्याप हाती लागला नाही. त्याचा कसून शोध सुरू आहे. त्याच्या घराच्या झडती घेण्यास आली असून, तलवारी जप्त केल्यामुळे आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात येईल.- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.