पांदन रस्ते चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:06+5:30
ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे.

पांदन रस्ते चिखलात
अंबाडा (मोर्शी) : अंबाडा तथा परिसरातील अनेक गावातील शेतीकडे जाणारे पांदण रस्ते चिखलात गेले आहेत.
पावसाळ्यात या पांदण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ती दुरवस्था शेतकऱ्यांसह मशागत करणाºया बैलजोडींसाठी जीवघेणी ठरत आहे. अनेक गावात या पांदण रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलबंडी उलटल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन तीन वर्षांपुर्वी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून पालकमंत्री पांदन रस्ते विकास योजना राबविण्यात आली. येथील तथाकथित यश पाहून ती त्याच नावाने राज्यभर राबविण्याचा मानसही तत्कालिन सरकारने व्यक्त केला. मात्र जिल्हयातील पांदन रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम आहे.
ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी कसा आणावा, ही फार मोठी विवंचना आहे. या पांदन रस्त्यातील चिखलात बैलबंडी रूतत असल्याने अनेक शेतकरी डोक्यावर कापसाचे गाठोडे आणतात. मात्र तुर, सोयाबिनसाठी यंत्र वा ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागते. पांदण रस्त्यांत चिखल असल्याने तो तुडवत शेतकरी जाईल, मात्र मजूर येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मोर्शी तालुक्यातील अनेक गावात अतिशय बिकट अवस्था असताना, लोकप्रतिनिधींनी देखिल दुर्लक्ष चालविले आहे. आधीच अस्मानी संकटांनी बेजार झालेला शेतकरी पांदण रस्त्यांच्या दुरवस्थेने बेजार झाला आहे. त्याचेसमोर नवा प्रश्न उभा ठाकला आहे.
अंबाडा ते पिपरी हा जुना वहिवाटीचा रस्ता होता. पण अतिक्रमण व काटेरी झुडपे वाढल्याने या पांदन रस्त्याने जात येत नाही. त्यामुळे पिंपरी येथील शेतकºयांना सायवाडा मार्गे जावे लागते. ४ ते ५ किमी अंतराचा फेरा मारावा लागतो.
-अनिकेत पवार,
शेतकरी, अंबाडा
हनुमान मंदिरापासून जाणाºया रस्त्यावर चिखल असल्याने, रस्ता अरू ंद झाल्याने शेतात ये-जा करता येत नाही. ३ ते ४ किमी अंतर पायदळ जावे लागते. पिके काढण्यासाठी उदखेड मार्गाने जावे लागते. रस्ता व्यवस्था नसल्याने मजूर मिळत नाही.
नारायण बोरकर,
शेतकरी, अंबाडा