नागठाणा येथील श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ येथे पावन वर्षायोग

By Admin | Updated: July 16, 2016 20:02 IST2016-07-16T20:02:43+5:302016-07-16T20:02:43+5:30

मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम सुरू झाला असून शनिवारी दुपारी ४ वाजता तीर्थक्षेत्रावर प्रवेश झाला

Pavan Varsha Yoga in Shri Parsodaya Teerth of Nagathana | नागठाणा येथील श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ येथे पावन वर्षायोग

नागठाणा येथील श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ येथे पावन वर्षायोग

>ऑनलाइन लोकमत -
मुनिश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे आगमन 
वरुड, दि. 16 - सातपुड्याच्या कुशीत चुडामणी नदीतीरी प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. येथे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम सुरू झाला असून शनिवारी दुपारी ४ वाजता तीर्थक्षेत्रावर प्रवेश झाला. त्यांच्या उपस्थिती जैन बांधवांनी वृक्षारोपण केले. यावेळी शेकडो जैन बांधवांची उपस्थिती होती. 
 
सातपुडा पर्वतात चुडामणीच्या काठावर मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र नागठाणा येथे श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ असून प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. पहिल्यांदा मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रमाला प्रांरभ होत आहे. मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे पावन तीर्थक्षेत्रावर शनिवारी दुपारी ४ वाजता आगमन झाले. १० हजार चौरस फूट क्षेत्रावर सन्मती अतिथी भवनाचे बांधकाम सुरू आहे. गुरुपोर्णिमेनिमित्त १९ जुलैला सकाळी विशेष गुरुपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जुलैला मांगलिक कार्यक्रम होणार असून यामध्ये सकाळी ८ वाजता अभिषेक, पूजन, १० वाजता आहारचर्या, ११ वाजता ध्वजारोहण, मंगलाचरण, सकाळी साडेअकरा वाजता कलश स्थापना विधी आणि दुपारी २ वाजता वात्सल्य भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विधानाचार्य पंडित संजय सरस चिचोली, पंडित संदीप भैय्या नागपूर, पंडित अजित शास्त्री रायपूर तसेच संगीतकरार सुवीर स्वर मंच चिंचोली उपस्थित राहून विवीध धार्मिक कार्यक्रम करणार आहे. या श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थावर भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.अरविंद भागवतकर, कमलेश खडके, विवेक सोईतकर, अनूप शहा, जयचंद्र ठोले, प्र्रकाश मांडवगडे, प्रदीप आगरकर, अ‍ॅड. देशबंधू महात्मे, विनय शहा सहश्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ समिती तसेच सुवीरसागर चातुर्मास समितीच्यावतीने केले आहे. 

Web Title: Pavan Varsha Yoga in Shri Parsodaya Teerth of Nagathana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.