पाटील बंधूंना पोलिसांनी घडविली कोठडीची सहल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:32+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी मानव सेवा विकास फाउंडेशनमार्फत बँकॉक सहलीचे आयोजन १६ जून २०१९ रोजी केले होते. प्रतिव्यक्ती ४० हजार रुपये दराने एकूण ४१ पर्यटकांची रक्कम त्यांनी स्वत:च्या खात्यात जमा केली. ४१ पर्यटक मुंबई विमानतळावर आले. त्यावेळी नंदकिशोर व विनोद कुणीही आले नाही. नंदकिशोरने त्यांचे कॉल रिसिव्ह न करता, सहल तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्याचे व पैसे आठ दिवसांत परत करण्याचे मेसेज पाठवले.

Patil brothers taken to jail by police! | पाटील बंधूंना पोलिसांनी घडविली कोठडीची सहल !

पाटील बंधूंना पोलिसांनी घडविली कोठडीची सहल !

Next
ठळक मुद्दे२७ पर्यंत पीसीआर : सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : थायलंड, बँकॉकमध्ये सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील नंदकिशोर अरुण पाटील (३०) व विनोद अरुण पाटील (३२, दोघेही रा. शहापुरा, अंजनगाव सुर्जी) यांना अंजनगाव पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहलीच्या नावावर ४१ पर्यटकांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या पाटील बंधूच्या दोन रात्री पोलीस कोठडीत गेल्या. पोलिसांनी कोठडीची सहल घडवून आणल्याची प्रतिक्रिया त्यानंतर उमटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी मानव सेवा विकास फाउंडेशनमार्फत बँकॉक सहलीचे आयोजन १६ जून २०१९ रोजी केले होते. प्रतिव्यक्ती ४० हजार रुपये दराने एकूण ४१ पर्यटकांची रक्कम त्यांनी स्वत:च्या खात्यात जमा केली. ४१ पर्यटक मुंबई विमानतळावर आले. त्यावेळी नंदकिशोर व विनोद कुणीही आले नाही. नंदकिशोरने त्यांचे कॉल रिसिव्ह न करता, सहल तांत्रिक कारणांमुळे रद्द झाल्याचे व पैसे आठ दिवसांत परत करण्याचे मेसेज पाठवले. परंतु, अद्याप रक्कम परत मिळाली नाही.

पुसद, जरूड येथील दोघांकडून तक्रार
पुसद येथील राजूसिंह धनसिंह जाधव (६२) व रजनी काळमेघ (रा. जरूड) यांनी २१ ऑक्टोबर रोजी अंजनगाव पोलीस ठाणे गाठून पाटील बंधूविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश जवरे तपास करीत आहेत.

विमानाची तिकिटे बनावट
राजूसिंह जाधव या माजी सैनिकाच्या तक्रारीनुसार, आरोपी नंदकिशोर पाटीलच्या नावे असलेल्या एसबीआयच्या शाखेतील खात्यात जाधव यांच्यासह रजनी काळमेघ यांनी एकूण २ लाख ४० हजार रु पये जमा केले. १५ एप्रिल ते ७ जून २०१९ या कालावधीत ही रक्कम जमा करण्यात आली. आरोपीने आपल्याला दिलेली विमानाची तिकिटे बनावट असल्याचा आरोप जाधव यांनी तक्रारीतून केला.

Web Title: Patil brothers taken to jail by police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.