अंजनगावात पथसंचलन
By Admin | Updated: September 16, 2015 00:16 IST2015-09-16T00:16:00+5:302015-09-16T00:16:00+5:30
अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.

अंजनगावात पथसंचलन
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. परंतु त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून अंजनगाव शहरात शांतता प्रस्थापित केली होती. त्याला मुख्य कारण तत्कालीन ठाणेदारपदी असलेले पोलीस निरीक्षक डोंगरे, ठाकरे, मानकर, पडघम व सद्यस्थितीत ठाणेदारपदी रुजू असलेले मल्लिकार्जुन इंगळे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पथसंचलन केले.
गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना अंजनगाव शहरात भावी काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, या मुख्य उद्देशाने उपविभागीय अधिकारी शिवतरे, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे, उपनिरीक्षक उपासे, छत्रपती घावट, गायकवाड यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन येथून ओम चौक, शनिवारा, आलम चौक, पाचपावली, नेताजी चौक, नवले चौक, डब्बीपुरा, शहापुरा मार्गे जुने एसटी स्टँड मार्गे गुलजारपुरा, पानअटाईमार्गे शनिवारा पोलीस स्टेशनमार्गे शहरातील दोन्ही भागामधून रुटमार्च काढण्यात आला. यामध्ये बनारस येथील सीआयएसएफचे २५ जवान व एक अधिकारी यामध्ये प्रमुख आकर्षण होते. रुटमार्चमध्ये पथ्रोट येथील पाच कर्मचारी व एक अधिकारी, रहिमापूर येथील पाच अधिकारी व एक कर्मचारी, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ३५ कर्मचारी व ६ अधिकारी असे ६७ कर्मचारी रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)