महिला डॉक्टरांकडून ‘बेटी बचाओ’साठी पथनाट्य

By Admin | Updated: September 15, 2016 00:18 IST2016-09-15T00:18:12+5:302016-09-15T00:18:12+5:30

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याच्या उद्देशाना शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्यावतीने बेटी बचाओचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला.

Pathania for female doctor from 'Beti Bachao' | महिला डॉक्टरांकडून ‘बेटी बचाओ’साठी पथनाट्य

महिला डॉक्टरांकडून ‘बेटी बचाओ’साठी पथनाट्य

गणेशोत्सवात उपक्रम : स्त्री रोग व प्रसुती शास्त्र संघटनेचे आयोजन
अमरावती : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याच्या उद्देशाना शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्यावतीने बेटी बचाओचा संदेश पथनाट्यातून देण्यात आला. गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन भाविकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने महिला डॉक्टरांकडून नागरिकांना हा संदेश देण्यात आला आहे.
'वंशाचा दिवा हवा' म्हणून काही पालक मुलीपेक्षा मुलांना प्राध्यान देतात. तसेच आजच्या आधुनिक युगातही स्त्री भृ्रण हत्येच्या घटना अनेकदा उघड झाल्या आहेत. त्यातच छुप्या मार्गाने लिंग तपासणी करणारी पालक मंडळी आहे. मात्र, गर्भलिंग तपासणीचा आरोप डॉक्टरावर केला जातो. हा प्रकार बंद व्हावा, मुलींनाही समान दर्जा प्राप्त व्हावा, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी शहरातील काही महिला डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. संचालक आशा ठाकरे, सहसंचालक तसेच सचीव प्रांजल शर्मा, आरती काबरा यांच्या चमुने गणेश मंडळांना भेटी देऊन पथनाट्याद्वारे 'बेटी बजाओ, बेटी पढाओ'चा संदेश दिला. यंदा महिला डॉक्टरांनी शहरातील विविध गणेश मंडळांने भेटी देऊन त्या ठिकाणी पथनाट्य सादर केले.

उपक्रमात सहभागी झालेले डॉक्टर
सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पथनाट्याद्वारे बेटी बचाओचा संदेश देण्याची संकल्पना आशा ठाकरे, प्रांजल शर्मा व आरती काबरा यांची आहे. या पथनाट्यात सुयोग्या पानट, चित्रा बनसोड, पूनम बेलोकार, ललिता लोखंडे, शीतल पोटोडे, सोनाली शिरभाते, ललीता डोले, रेवती ढवले, ज्योती अग्रवाल यांच्यासह अन्य डॉक्टरांचा सहभाग आहे.

Web Title: Pathania for female doctor from 'Beti Bachao'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.