पहिलाच प्रयोग फसला, मानवविकास बसेस लॉकडाऊन
परतवाडा : स्थानिक एसटीबस आगारातून पुण्याकरिता सोडल्या गेलेल्या शिवशाही बसला प्रवाशांनी नाकारले. महामंडळाला याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दिवाळीनंतर १६,१७ आणि १८ नोव्हेंबर रोजी पुण्याकरिता परतवाडा-पुणा मार्गे शिवशाही बसेस सोडल्या गेल्या. यात १६ नोव्हेंबर रोजी केवळ दोन प्रवासी पुण्याला गेले. १७ नोव्हेंबरला ७ प्रवासी, तर १८ नोव्हेंबरला केवळ ५ प्रवासी गेलेत. येणे-जाणे अशी शिवशाहीच्या एका ट्रिपला जवळपास ३२ हजार रुपयांचे डिझेल लागले. पण उत्पन्न मात्र १५ हजार एवढेच झाले. पुणा मार्गावर परतवाडा डेपोतून डेपो अस्तित्वात आला तेव्हापासून पहिल्यांदा एसटीबस पाठविल्या गेली. पण, हा पहिलाच प्रयोग फसल्यामुळे पुणा बस थांबविण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने जाहीर लॉकडाऊन मध्ये परतवाडा डेपोतून बंद ठेवण्यात आलेल्या मानवविकास बसेस आजही बंद आहेत. विद्यर्थ्यांची वाहतूक करण्याकरिता परतवाडा डेपोतून एकूण या ११ बसेस चालविल्या जातात. या अकराही बसेस चिखलदरा आणि धारणी परिक्षेत्रात धावतात. दरम्यान या अकराही बसेस मागील आठ महिन्यांपासून लॉकडाऊनच आहेत.
बॉक्स
विद्यार्थी पासेसच नाहीत
शाळा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्याकरिता बसेसच्या पासची मागणी दरवर्षी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बसेसच्या पासकरिता अजूनपर्यंत परतवाडा डेपोकडे मागणीच नाही. काही तुरळक प्रमाणात आयटीआय आणि काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी पास नेल्या आहेत. काढल्या आहेत. पण ही संख्या फारच कमी आहे.
बॉक्स
प्रवाशी वाढले
परवाडा डेपो अंतर्गत अमरावती आणि अकोला मार्गावर प्रवासी वाढले आहेत. या मार्गावर उत्पन्नही बऱ्यापैकी आहे. ग्रामीण भागातही मुक्कामाला एसटी बस पाठविल्या जात आहेत. लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या टप्प्यापेक्षा सध्या सर्वच मार्गावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. एसटी लागताच, येताच त्यात बसण्याकरिता घाई करणारे प्रवाशीही बघायला मिळत आहेत.
बॉक्स
निर्जंतुकीकरण
मार्गावर धारणारी प्रत्येक बसचे डेपोतील वर्क शॉपमध्ये आजही निर्जंतुकीकरण केले जात आहे. बसेस आतून बाहेरुन स्वच्छ धुतल्या जात आहेत. दरम्यान बसस्थानकावर बसलागताच होणारे निर्जंतुकीकरण प्रवाशांची गर्दी व बसमध्ये चढण्याच्या त्यांच्या घाईमुळे केल्र्या जात नाही. होत नाही. प्रवाशांना वारंवार मास्क करीता सुचना दिल्या जात असल्या तरी बीना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.