प्रवासी वाहनाची ट्रकला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:10 IST2020-12-27T04:10:36+5:302020-12-27T04:10:36+5:30
फोटो पी २६ बहिरम चुरणी : लाखनवाडी येथून अकोल्याकडे परतणाऱ्या प्रवासी वाहनाने ट्रकला धडक दिली. या अपघातात प्राणहानी झाली ...

प्रवासी वाहनाची ट्रकला धडक
फोटो पी २६ बहिरम
चुरणी : लाखनवाडी येथून अकोल्याकडे परतणाऱ्या प्रवासी वाहनाने ट्रकला धडक दिली. या अपघातात प्राणहानी झाली नसली, तरी परतवाडा बैतुलकडे जाणारी वाहतूक मात्र बराच काळ खोळंबली होती. बहिरम चेकपोस्टनजीक शनिवारी दुपारी हा अपघात घडला.
अकोला नजीकच्या गायगाव व नांदुरा येथील १२ भक्त लाखणवाडी येथे चारचाकी वाहनाने दर्शनास आले होते. नंतर ते लामघाटी येथे गेले. तेथून परत जात असताना बैतुलकडे जाणाऱ्या एमएच २८ बी ८९३१ या ट्रकला ते चारचाकी वाहन धडकले. चालकाच्या निष्काळजीपणाने झालेल्या या अपघातात वाहनाचा चालकाकडील भाग चेंदामेंदा झाला. चालकासह १२ प्रवासी किरकोळ दुखापत वगळता सुखरुप बचावले.
-------------------