शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या कायम बंद करण्याचा घाट? गरीब,सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:16 IST

भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे.

 - गणेश वासनिक

अमरावती - भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. १ जानेवारी २०१९ पासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्यांमुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे हाल होत असून, आर्थिक फटकादेखील बसत आहे. सहा रेल्वे पॅसेंजर बंद असल्याची माहिती आहे.पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे कमी असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विशेषत: अकोला, नागपूर, शेगावकडे ये-जा करण्यासाठी पॅसेंजर गाडीला अधिक पसंती दिली जाते. मात्र, भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे आणि पावसाळ्यापूर्वी पुलांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्यात. परंतु, सहा महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही पॅसेंजर गाड्या सुरु होत नसल्याने बहुतांश प्रवाशांना एसटी अथवा महागड्या रेल्वेच्या एक्स्प्रेसने प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्यातून रेल्वेला आर्थिक उत्पन्न मिळत असताना बंद करण्याचे कारण हे गुलदस्त्यात आहे. लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजर गाड्यांचे थांबे असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांसाठी ते सोईचे ठरत होते. मात्र, जानेवारीपासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या जुलै महिना संपण्याकडे वाटचाल सुरू झाली असताना, त्या सुरू होत नसल्याचे चित्र आहे.     या सहा पॅसेंजरच्या फे-या बंद भुसावळ ते नागपूर दरम्यान सहा पॅसेंजर गाड्यांच्या फेºया बंद करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ-वर्धा, अमरावती-नागपूर, वर्धा-भुसावळ,  भुसावळ-वर्धा, नागपूर-अमरावती, वर्धा-भुसावळ अशा सहा फेºया बंद झाल्या आहेत. नरखेड-भुसावळ आणि अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू आहे. अमरावती-बडनेरा लोकलसुद्धा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह गरीब, कामगारांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

 प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमजानेवारीपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिका-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. 

नागपूर-भुसावळ दरम्यान बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना निवेदन देण्यात आले आहे. ही मागणी दैनंदिन प्रवासी वर्गांनी आधीच केलेली आहे. बंद पॅसेंजर का सुरू झाल्या नाहीत, यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू.- नवनीत रवि राणा, खासदार, अमरावती     काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर कामे अद्यापही सुरूच आहेत. दरदिवसाला दोन ते तीन तासांचे ब्लॉक होत आहेत. अद्यापपर्यंत बंद पॅसेंजर गाड्यासंदर्भात निर्णय झाला नाही.      - पी.के. सिन्हा   प्रबंधक, रेल्वे स्थानक बडनेरा.     पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. सहा महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे बस किंवा महागडा प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्या सुरुव्हाव्यात.    - रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAmravatiअमरावती